Elon Musk यांची मोठी घोषणा; दोन तासांचे व्हिडीओ करता येणार अपलोड

ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी ट्विटर ब्लू सब्स्क्रायबर्ससाठी एक मोठी घोषणा केली आहे.
Twitter | Elon Musk
Twitter | Elon Musk Dainik Gomantak

Elon Musk Latest News: एलन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून सातत्याने नवनवीन बदल ते करत आहेत. त्यांनी अनेकदा सांगितले की, ट्विटरला तोट्यातून बाहेर काढण्याच्या दृष्टीने ते प्रत्येक गोष्टीचा विचार करतात. आतापर्यंत त्यांनी ट्विटर युजर्ससाठी अनेक नवे फिचर्सही लाँच केले आहेत.

याशिवाय ट्विटरने अनेक सुविधांचे पैसे आकारण्यास सुरुवात केली आहे. युजर्सना त्यांच्या अकाउंटला ब्ल्यू टिक मिळवण्यासाठी शुल्क भरावे लागते. यासोबतच ब्ल्यू टिक सबस्क्रिप्शन घेणाऱ्या युजर्सला ट्विटरकडून इतरही अनेक सुविधा दिल्या जातात.

याच युजर्ससाठी आता मस्क आणखी एक फिचर घेऊन आले आहेत. ट्विटर ब्लूचे सदस्यांना आता दोन तासांची व्हिडीओ क्लिप अपलोड करु शकणार आहेत.

एलन मस्क यांनी जाहीर केले आहे की, आता ट्विटर ब्लूचे सदस्य दोन तासांच्या 8 GB पर्यंतच्या व्हिडीओ अपलोड करू शकणार आहे. याबाबत त्यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. एलन मस्क यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट केले की, "ट्विटर ब्लू व्हेरिफाईड सब्सक्रायबर आता दोन तासांचा व्हिडीओ अपलोड करू शकतात." म्हणजेच, ही सेवा मिळवण्यासाठी यूजर्सना ट्विटर ब्लूचे सदस्यत्व घेणे गरजेचे आहे. त्यानंतरच ते दोन तासांचा व्हिडीओ ट्विटरवर अपलोड करु शकणार आहेत. 

Twitter | Elon Musk
Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील आजचे पेट्रोल - डिझेलचे दर जाहीर, जाणून घ्या ताजे भाव
  • ट्विटरला मिळाल्या नव्या सीईओ

अलिकडेच एलन मस्क यांनी ट्विटरच्या नव्या सीईओंचीही घोषणा केली. त्यांनी लिंडा याकारिनो यांच्याकडे ट्विटरच्या सीईओ पदाची जबाबदारी सोपवली आहे. मायक्रोब्लॉगिंग साईटच्या सीईओ बनल्यानंतर लिंडा यांनी आपल्या पहिल्या ट्वीटमध्ये एलन मस्क यांचे आभार मानले आहेत.

  • ट्विटर ब्लू म्हणजे काय?

ट्विटरने घोषणा केली होती की, कंपनी सशुल्क ब्लू टिक सेवा सुरू करणार आहे. सुरुवातीला हे यूएस, यूके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये लाँच करण्यात आले होते.

त्यानंतर भारतातही याची सुरुवात झाली. या अंतर्गत, या सेवेसाठी पैसे देणाऱ्यांनाच त्यांच्या खात्यावर ब्लू टिक मिळू शकते. भारतात ट्विटर ब्लूचे सबस्क्रिप्शन रु. 650 पासून सुरू होते. मोबाईल युजर्सना दरमहा 900 रुपये आकारले जातात. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com