Elon Musk: कमवलं तेवढं गमवलं! गिनिज बुकमध्ये नावच नोंदवलं

Elon Musk: जपानी टेक गुंतवणूकदार मासायोशी सोनच्या 58.6 बिलियन डॉलरच्या नुकसानीच्या मागील रेकॉर्डला मागे टाकले असल्याचे गिनिज बुकच्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे.
Elon Musk
Elon MuskDainik Gomantak

Elon Musk: गेल्या काही दिवसांपासून टेस्ला आणि स्पेसेक्सचे सीईओ इलॉन मस्क सातत्यानं चर्चेत आहेत. आता त्यांच्या नावाची गिनिज बुक ऑफ वर्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. त्यामुळं ते पुन्हा चर्चेत आले आहेत. इलॉन मस्क यांनी सर्वाधिक संपत्ती गमावण्याचा रेकॉर्ड केला आहे.

ट्विटर खरेदी केल्यापासून इलॉन मस्क यांच्या एकूण संपत्तीमध्ये सातत्यानं घट झाली आहे. आतापर्यंतच्या इतिहासात वैयक्तिक मालमत्तेचे सर्वात मोठे नुकसान सहन करण्याचा जागतिक विक्रम मस्क यांनी केल्याचं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सकडून सांगण्यात आले आहे.

मस्क यांनी नोव्हेंबर 2021 पासून सुमारे 182 अब्ज डॉलर गमावले आहेत परंतु इतर संस्थाकडून हा आकडा 200 बिलियन डॉलरच्या आसपास असल्याचे सांगण्यात येत आहे. हा रेकॉर्ड स्वताच्या नावावर केल्यानंतर त्यांनी जपानी टेक गुंतवणूकदार मासायोशी सोनच्या 58.6 बिलियन डॉलरच्या नुकसानीच्या मागील रेकॉर्डला मागे टाकले असल्याचे गिनिज बुकच्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे.

Elon Musk
US Air Service: अमेरिकन एअर मिशन सेवेत बिघाड, हवाई सेवेवर परिणाम

जगभरात इलॉन मस्क यांची सर्वात श्रीमंत व्यक्तीपैंकी एक म्हणून ख्याती आहे. त्याबरोबरच उद्योग- व्यवसायात येण्यासाठी उत्सुक असणाऱ्या तरुण पीढी इलॉन मस्क यांना आदर्श मानते. गेल्या वर्षी त्यांनी ट्वीटरची खरेदी केली. मालकी हातात येताच त्यांनी ट्वीटरसंबंधित अनेक बदल केले. ब्लू टीक सामांन्यासाठी, गोल्डन टीक व्यापाऱ्यांसाठी आणि ग्रे टीक ही शासनासाठी असे प्रकारही त्यांनी केले.

मात्र, ट्वीटर( Twitter) खरेदी केल्यापासून त्यांच्या संपत्तीत सातत्याने घट झाल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर, ट्वीटर हेच त्यांच्या संपत्ती कमी होण्यास कारणीभूत आहे असेही मत व्यक्त केले जात आहे. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वात जास्त संपत्ती गमावण्याचा रेकॉर्ड स्वत:च्या नावावर करुन इलॉन मस्क( Elon Musk ) पुन्हा चर्चेत आले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com