Elon Musk: चीन-तैवान वाद कसा मिटणार? एलन मस्क यांनी सुचविला उपाय

तैवानमध्ये स्टारलिंक इंटरनेट सेवा देऊ नका, चीनची मस्क यांच्याकडे मागणी
Elon Musk
Elon MuskDainik Gomantak

Elon Musk: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्त एलन मस्क यांनी काही दिवसांपुर्वीच रशिया आणि युक्रेन युद्ध संपुष्टात आणण्यासाठी एक उपाय सुचविला होता. त्यानंतर युक्रेनने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर आता मस्क यांनी चीन आणि तैवान यांच्यातील वाद मिटविण्यासाठी प्लॅन सांगितला आहे.

Elon Musk
Facebook Users Data leak: तुम्ही फेसबुकचा पासवर्ड बदलला की नाही?

चीन-तैवान (China And Taiwan) यांच्यातील तणाव संपविण्यासाठी तैवानचे थोडे नियंत्रण बीजिंगकडे सोपवले जावे, असा पर्याय त्यांनी सुचविला आहे. टेस्ला आणि स्पेस एक्स या कंपन्यांचे मालक असलेल्या मस्क यांनी 'फायनान्शियल टाईम्स'ला मुलाखत दिली आहे.

मस्क यांनी या मुलाखतीत म्हटले आहे की, माझी शिफारस ही तैवानसाठी एक विशेष प्रशासकीय क्षेत्र शोधण्याविषयी आहे. जी स्वीकारार्ह आहे. सगळ्यांनाच खुष करावे, असा विचार त्यांनी ठेऊ नये. कदाचित त्यांच्याकडे अशी एखादी व्यवस्था असावी जी हाँगकाँगपेक्षाही उदार असावी. तैवानविषयी संघर्ष अपरिहार्य आहे. आणि केवळ टेस्लाच नव्हे तर अॅपल कंपनीसह इतर मोठ्या अर्थव्यवस्थांवर याचा परिणाम होणार आहे. स्पेस एक्स कंपनीची स्टारलिंक ही इंटरनेट सेवा तैवानमध्ये सुरू करू नये, असे आश्वासन चीनने माझ्याकडून मागितले आहे.

Elon Musk
Putin And Zelensky: पुतिन-झेलेन्स्की येणार एकाच मंचावर?

तैवान हा चीनचाच प्रांत असल्याचे चीन मानतो. तैवानला पुर्णतः आपल्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी ते बलाचा वापरही करू शकतात. याउलट तैवानचे भवितव्य तैवानचे लोक ठरवतील, असे तैवानने स्पष्ट केले आहे

या आठवड्याच्या सुरवातीलाच एलन मस्क यांनी युक्रेनला रशियाविरूद्धचे युद्ध थांबविण्यासाठी एक प्रस्ताव सुचवला होता. त्या प्रस्तावात युक्रेनने क्रीमियाला कायमस्वरूपी रशियाला सोपवावे, असे म्हटले होते. त्यावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी मस्क यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली होती. त्यांनी ट्विटर पोलमध्ये तुम्हाला कोणता इलॉन मस्क आवडतो, जो रशियाला पाठिंबा देतो तो की जो युक्रेनसोबत आहे तो? असा सवाल केला होता.

टेस्ला आणि स्पेस एक्स या कंपन्यांचे प्रमुख असलेले एलन मस्क हे सध्या 44 बिलियन डॉलरचा करार करून ट्विटरवर नियंत्रण मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. टेस्ला कंपनीचा शांघायमध्ये इलेक्ट्रिक कार निर्मितीचा मोठा कारखाना आहे. गतवर्षी टेस्लाच्या जागतिक पातळीवरील विक्रीतील निम्मा वाटा शांघाय कारखान्यातून आला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com