टेस्ला कारच्या ऑटोपायलट मोडवर झालेल्या अपघातावर अ‍ॅलॉन मस्क यांनी दिली प्रतिक्रिया

दैनिक गोमंतक
मंगळवार, 20 एप्रिल 2021

अ‍ॅलॉन मास्क यांच्या टेस्ला कंपनीने स्वयंचलित कार निर्माण केली आणि तिची जगभर चर्चा सुरु झाली. मात्र सध्या ही कार एका अपघातामुळे चर्चेत आली आहे.   

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने माणसाने अनेक अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत. अशाच काही प्रयोगांसाठी टेस्ला कंपनीचे एलोन मस्क हे जगभरात प्रसिद्ध आहेत. अ‍ॅलॉन मास्क यांच्या टेस्ला कंपनीने स्वयंचलित कार निर्माण केली आणि तिची जगभर चर्चा सुरु झाली. मात्र सध्या ही कार एका अपघातामुळे चर्चेत आली आहे.( Elon Musk reacts to a Tesla car crash in autopilot mode)

अ‍ॅलॉन मस्क (Elon Musk) यांच्या टेस्ला कंपनीच्या कारचा टेक्सास (Rexas)मध्ये ऑटो पायलट मोडवर असताना अपघात झाला होता. टेस्ला कारच्या या अपघातामध्ये २ लोकांचा मृत्यू झाल्याचे देखील सांगण्यात आले आहे. मात्र अ‍ॅलॉन मास्क यांनी आता यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना "अपघात घडला त्यावेळेला ही कर ऑटो पायलट मोडवर नव्हती" असे सांगितले आहे. तर पोलीस आणि स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या कारचा अपघात झाला त्यावेळी ड्रायव्हर सीटवर कुणीही नव्हते असे समजते आहे. त्यावरून कार ऑटोपायलट मोडवर होती असे स्पष्ट होत असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच अ‍ॅलॉन मस्क यांनी ट्विट करण्यापूर्वी कार मधील डेटा उडवला असल्याची देखील शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या गाडीच्या डेटाची चौकशी करण्यासाठी  पोलिसांकडून  सर्च वारंट देखील दिले जाणार असल्याचे समजते आहे. 

दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या या अपघाताची रस्ते सुरक्षा विभागाकडून चौकशी केली जाणार आहे. यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या असून ही टेस्ला (Tesla) कारचा हा 28 वा अपघात असल्याचे सांगण्यात येते आहे. नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डाकडून सुद्धा या घटनेची चौकशी होणार असल्याचे समजते आहे. 

कोरोना लसीच्या कच्च्या मालावरील निर्बंध हटवण्याबद्दल अमेरिकेने दिली प्रतिक्रिया

संबंधित बातम्या