"अ‍ॅमझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांना मागं टाकत, यांनी मिळवला जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान"

वृत्तसंस्था
शुक्रवार, 8 जानेवारी 2021

जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान टेस्ला आणि स्पेसएक्स  या जगप्रसिध्द इलेक्ट्रिक कार बनवणाऱ्या कंपनीचे संस्थापक एलन मस्क यांनी पटकावला.

वॉशिंग्टन : जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान टेस्ला आणि स्पेसएक्स  या जगप्रसिध्द इलेक्ट्रिक कार बनवणाऱ्या कंपनीचे संस्थापक एलन मस्क यांनी पटकावला. अ‍ॅमझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांना मागं टाकत हा कीताब पटकावला आहे.टेस्लाच्या शेअर्समध्ये चक्क 4.8% ने वाढ झाली आहे.त्यामुळे एलन मस्क जगातील 500 लोकांच्या ब्लूमबर्गच्या यादीत पहिला क्रमांक मिळवला आहे.एलन मस्क यांच्या संपत्तीत जे बेजोस यांच्या संपत्तीच्या तुलनेत 1.5 अब्ज डॉलरची वाढ नोंदवली गेली आहे.

यापूर्वी 2017 मध्ये बेजोस याच ब्लूमबर्गच्या यादीत पहिल्या स्थानी होते.हे स्थान आता एलन मस्क यांनी पटकावलं आहे.दरम्यान मस्क यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाल्याचं एका निरिक्षणात नोंदवलं गेलं होतं.नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच मस्क यांची संपत्ती 185 अब्ज डॉलर झाली आहे. यामुळे जेफ बेजोस यांना पहिलं स्थान गमवावं लागलं आहे.आक्टोबर 2017 पासून जेफ पहिल्या क्रमांकावर होते. मात्र 2021मध्ये बेजोस यांना मागं टाकत एलन मस्क जगातील सर्वाधिक श्रीमंत होण्याचा मान पटकावला.

ब्लूमबर्ग यादीतील पहिला क्रमांक कसा ठरवते-

बिलीयनर्सच्या यादीमध्ये अब्जाधीशांकडे असणाऱ्या एकूण संपत्तीच्या आधारे पहिला क्रमांक ठरवले जातात.

संबंधित बातम्या