Elon Musk: इलॉन मस्क यांची ट्विटर कर्मचार्‍यांना धमकी; तर...थेट खटला करणार दाखल

ट्विटरच्या कर्मचार्‍यांना अल्टिमेटम जारी केला आहे.
Elon Musk
Elon MuskDainik Gomantak

जगप्रसिद्ध शॉर्ट मेसेजिंग सोशल माध्यम ट्विटरची (Twitter) सूत्रे नुकतीच इलॉन मस्क यांनी आपल्या हाती घेतली आहेत. मस्क ट्विटरचे बॉस झाल्यानंतर त्यांनी कंपनीत अनेक मोठे बदल केले आहेत. दरम्यान, ट्विटरच्या गोपनीय माहितीबाबत देखील मस्क (Elon Musk) जास्त गांभीर्याने विचार करत असून, यावरून त्यांनी थेट ट्विटरच्या कर्मचार्‍यांना धमकी दिली असून, अल्टिमेटम जारी केला आहे.

Elon Musk
Pope Francis Ukraine War: युद्धग्रस्त युक्रेनबद्दल बोलताना पोप फ्रान्सिस भावूक, पाहा व्हिडिओ

ट्विटरची गोपनीय माहिती लीक करण्याबद्दल मस्क अधिक सक्त झाले आहेत. कर्मचाऱ्यांनी कोणतीही माहिती प्रेसला देऊ नये अन्यथा कायदेशीर परिणाम भोगावे लागतील. अशी थेट धमकी मस्क यांनी दिली आहे. तसेच, याबाबत कर्मचाऱ्यांची प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी देखील घेतली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीची गोपनीय माहिती लीक करणे कंपनी हिताच्या विरुद्ध आणि नियमांचे उल्लंघन करणारे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Elon Musk
Mahnaz Mohammadi: इराणी दिग्दर्शिकेने केरळ फिल्म फेस्टिव्हलमध्ये चक्क पाठवले स्वतःचे केस; 'हे' आहे कारण...

विशेषत: माध्यमांना काही माहिती पाठविल्यास त्याविरोधात योग्य कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, ट्विटरमध्ये कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढून टाकणे तसेच, राजीनामानाट्य मागील काही दिवासांपासून सुरू आहे. अशात मस्क यांच्या नव्या फतव्या मुळे ट्विटरचे कर्मचारी अजून त्रस्त झाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com