भारतीय प्रवाशामुळे फ्रान्सहून दिल्लीला निघालेल्या विमानाचं बल्गेरियात इमरजन्सी लँडिंग

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 7 मार्च 2021

पॅरिसहून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या एअर फ्रान्सच्या विमानाने शुक्रवारी एका भारतीय प्रवाशामुळे सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बल्गेरियातील सोफिया विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केले. 

बल्गेरिया : पॅरिसहून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या एअर फ्रान्सच्या विमानाने शुक्रवारी एका भारतीय प्रवाशामुळे सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बल्गेरियातील सोफिया विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केल्याचे बल्गेरियन अधिकाऱ्यांनी सांगितले. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या अधिकारी इव्हॅलो अँजेलोव्ह यांनी सांगितले कि, एक भारतीय नागरिक असलेला प्रवासी, टेक ऑफ घेतल्यानंतर विमानात गोंधळ घालू लागला, इतर प्रवाशांशी भांडण करीत, विमान मदतनीसांशी वाद घालत, विमानाच्या कॉकपिटच्या दरवाजाला धक्का मारत उपद्रव माजवू लागला. 

या कंपनिने केले 'जगातील सर्वात लांब शूज' लाँच; सोशल मिडियावर फोटो व्हायरल

त्याच्या आक्रमक वर्तनामुळे फ्लाइटच्या कमांडरला सोफियात आपत्कालीन लँडिंग घेण्यास प्रवृत्त केले. सदर प्रवाशाला विमानातून खाली उतरवत त्याच्यावर उड्डाण सुरक्षेला धोका आणल्याचा ठपका ठेवला गेला आहे. दोषी ठरल्यास त्याला 10 वर्षापर्यंत तुरूंगवासाची शिक्षा भोगावी लागू शकते. सदर प्रवाशाचे नाव सार्वजनिक कऱण्यात आलेले नाही. त्याला खाली उतरवल्यानंतर एअर फ्रान्सच्या विमानाने पुन्हा नवी दिल्लीकडे प्रवास सुरू केला. अँजेलोव्ह यांनी पत्रकारांना सांगितले की, “आम्ही त्याच्या उपद्रवी वागण्याच्या कराणाचा शेध घेत आहोत. त्याच्या अशा वागण्याबाबत कोणतेही वाजवी स्पष्टीकरण मिळालेले नाही."

178 विश्वासार्ह मत मिळाल्याने इम्रान खान सरकारची वाचली सत्ता

संबंधित बातम्या