कोरोनामुळे स्पेनमध्ये मेपर्यंत आणीबाणी

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

कोरोनाची नवी साथ रोखण्यासाठी स्पेनमध्ये मेच्या सुरुवातीपर्यंत आणीबाणी घोषित करण्यात आली. त्याचबरोबर संपूर्ण देशात संचारबंदीही जाहीर करण्यात आली.

माद्रिद:  कोरोनाची नवी साथ रोखण्यासाठी स्पेनमध्ये मेच्या सुरुवातीपर्यंत आणीबाणी घोषित करण्यात आली. त्याचबरोबर संपूर्ण देशात संचारबंदीही जाहीर करण्यात आली. स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सॅंचेझ यांनी ही घोषणा करताना देश सध्या खूपच प्रतिकूल परिस्थितीतून जात असल्याचे सांगितले. स्पेनमधील कोरोना रुग्णांची संख्या दहा लाखांवर गेल्यावर हा निर्णय झाला. आंतरजिल्हा प्रवासावरही निर्बंध आणण्याचा विचार स्पेनमध्ये सुरु आहे.

संबंधित बातम्या