पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेसाठी हेरगिरी; दोन भारतीय जवानांना अटक

हरप्रीतसिंग (Harpreet Singh) आणि गुरभेजसिंग (Gurbhejsing) अशी या जवानांची नावे आहेत.
Two Indian soldiers Arrested
Two Indian soldiers ArrestedDainik Gomantak

चंडीगड : आयएसआय (ISI) या पाकिस्तानी (Pakistan) गुप्तचर यंत्रणेशी संधान साधत हेरगिरी केल्याच्या आरोपावरुन भारतीय लष्करातील दोन जवानांना अटक (Arrested) करण्यात आल्याचे पंजाब पोलिसांनी सांगितले आहे. हरप्रीतसिंग (Harpreet Singh) आणि गुरभेजसिंग (Gurbhejsing) अशी या जवानांची नावे आहेत. पैकी हरप्रीतसिंग हा 19 राष्ट्रीय रायफल्समधील जवान असून त्याला जम्मू काश्मीरच्या अनंतनाग (Anantnag) जिल्ह्यामध्ये तैनात करण्यात आले होते. तर गुरभेजसिंग हा 18 व्या शीख लाइट इन्फण्ट्रीमधील जवान असून त्याला कारगिलमध्ये कारकून या पदावर तैनात करण्यात आले होते.

Two Indian soldiers Arrested
सेना प्रमुख जनरल नरवणे यांनी ब्रिटनच्या सेनाधिकाऱ्यांची घेतली भेट !

देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेशी आणि संरक्षणविषयक संबंधित 900 हून अधिक दस्तऐवज या दोन्ही आरोपींनी फेब्रुवारी ते मे 2019 या कालावधीमध्येच सीमेपलीकडून अमली पदार्थ तस्कर रणवीरसिंग (Ranveer Singh) याच्याकडे यापूर्वीच सुपुर्द केला असल्याचे पंजाब पोलिस महासंचालक दिनकर गुप्ता (Dinkar Gupta) यांनी सांगितले आहे. रणवीरसिंगने त्याला मिळालेले दस्ताऐवज पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा असलेल्या आयएसआयकडे सुपुर्द केले. रणवीरसिंग याची जालंधर ग्रामीण पोलिसांनी चौकशी केली होती. त्यावेळी त्याच्याकडून गोपनीय दस्तऐवज जप्त केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com