पाकिस्तानातील महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराबद्दल युरोपीय महासंघाच्या संसदेने व्यक्त केली चिंता

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

पाकिस्तानमधील महिला हिंसाचालाबद्दल युरोपीय महासंघाच्या (इयु) संसदेने चिंता व्यक्त केली आहे. इयु क्रॉनीकल मासिकाने याविषयीचे प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे.

ब्रुसेल्स :  पाकिस्तानमधील महिला हिंसाचालाबद्दल युरोपीय महासंघाच्या (इयु) संसदेने चिंता व्यक्त केली आहे. इयु क्रॉनीकल मासिकाने याविषयीचे प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. त्यानुसार १३ सप्टेंबर रोजी संसदेच्या सदस्यांनी महासंघाचे उपाध्यक्ष जोसेप बोरेल यांना प्रश्न विचारला. बोरेल हे परराष्ट्र व्यवहार आणि सुरक्षा धोरण संघटनेचे वरिष्ठ प्रतिनिधीही आहेत. सदस्यांमध्ये समीरा रफाएला, कॅरेन मेल्चोईर, अबीर अल् साहलानी, रॅड्का मॅक्सोवा, सिल्वीए ब्रुनेट, इरीन टोलोरेट, आदींचा समावेश आहे. या सर्व जणी रिन्यू पोलीटीकल ग्रुपच्या आहेत.

पाकिस्तानमधील लैंगिक हिंसाचाराच्या प्रकरणांचा तुम्ही निषेध करता का, पाकिस्तानबरोबरील सध्याच्या किंवा भविष्यातील संवादात तुम्ही ठोस कृतीबाबत विचारणा करणार का असे प्रश्न विचारण्यात आले. पाकने महिला हक्कांचे प्रवर्तन आणि महिलांविरुद्धच्या हिंसाचाराच्या प्रकारांचे उच्चाटन व्हावे म्हणून योजनेसाठी पाठपुरावा मुद्दाही उपस्थित केला.

संबंधित बातम्या

Tags