युरोपियन युनियनचा चित्रपट महोत्सव होणार ऑनलाईन पद्धतीने

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

भारतासह जगभरात सर्वत्र होणार युरोपियन युनियन चित्रपट महोत्सव यावर्षी ५ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. दरवर्षी गोवा मनोरंजन संस्थेच्या मेकेनीज पॅलेसमध्ये हा महोत्सव पार पडतो. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा महोत्सव आभासी पद्धतीने पार पडणार असल्याची माहिती इइसजीने दिली.

पणजी : भारतासह जगभरात सर्वत्र होणार युरोपियन युनियन चित्रपट महोत्सव यावर्षी ५ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. दरवर्षी गोवा मनोरंजन संस्थेच्या मेकेनीज पॅलेसमध्ये हा महोत्सव पार पडतो. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा महोत्सव आभासी पद्धतीने पार पडणार असल्याची माहिती इइसजीने दिली.

यावर्षी या महोत्सवाची २५ वी आवृत्ती असणार आहे.  यावर्षी हा महोत्सव आभासी असणार असल्याने तो अधिकाधिक लोकांनी पाहावा अशी अपेक्षा आयोजकांनी केली आहे. या महोत्सवासाठीची नावनोंदणी हि पूर्णपणे मोफत असणार आहे. ५ ते ३० नोव्हेंबरच्या कालावधीत एकूण ४२ उत्कृष्ट चित्रपट या महोत्सवात पाहता येणार आहेत. महोत्सवासाठी नोंदणी http://festivalscope.com/signup.html या वेबसाईटवर इच्छुक करू शकतात किंवा अधिक माहितीसाठी euffindia.com आणि www.esg.co.in या वेबसाईटवर भेट देऊ शकता. हा महोत्सव एकूण २७ देशांमध्ये होतो. यावर्षी या महोत्सवात द ग्राउंड बिनिथ माय फिट, अलोन माय वेडिंग, राउंड्स, मेअर, स्ट्रगलिंग हेन्ड्रिक्स, फोरमन व्हर्सेस फोरमन यासारखे दर्जेदार चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.

संबंधित बातम्या