Suez canal Blockage: अडथळा दूर झाला; मात्र आता नवी समस्या उद्भवण्याची शक्यता

Suez canal Blockage
Suez canal Blockage

जगभरात होणारी सामानाची वाहतूक ही एकट्या सुएझ कालव्यातून 30 टक्क्यांपेक्षा जास्त होते. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपासून कपडे, शूज, घरगुती साहित्य यांसारख्या गोष्टींची ने-आण ही या 193 किलोमीटर लांब असणाऱ्या सुएझ कालव्यातून होत असते. मात्र इजिप्तच्या याच सुएझ कालव्यात मंगळवार पासून जहाजांचा मोठी रांग लागली होती. चीनहून माल घेऊन जाणाऱ्या एव्हरग्रीन नावाचे व्यापारी जहाज 23 मार्च रोजी कालव्यात अडकून पडले होते. त्यामुळे लागलेल्या जाम मध्ये आशियातून माल घेऊन जाण्यासाठी निघालेले मोकळे कंटेनर जहाज देखील मोठ्या प्रमाणावर एकाच जागी थांबल्याचे पाहायला मिळाले. पण त्यानंतर आज सुएझ कालव्यात अडकून पडलेले जहाज हलवण्यात यश आले असले तरी जागतिक क्षमता आणि उपकरणांवर मोठा परिणाम होणार असल्याचे मत जगातील सर्वात मोठी कंटेनर शिपिंग कंपनीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. (Even if the obstruction in the Suez Canal is removed new problems are likely to arise at the port)

सुएझ कालव्यात मागील काही दिवसांपासून अडकलेले जहाज निघाले असले तरी येथील परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी कालावधी लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे. जगात मालाची वाहतूक करणाऱ्या सर्वात मोठ्या कंटेनर शिपिंग कंपनीचे अधिकारी मार्स्क यांनी एका माध्यमाला दिलेल्या माहितीत यासंदर्भात बोलताना सुएझ कालव्यात अजून तीन जहाजे अडकले असल्याचे सांगितले. याशिवाय 29 जहाजे कालव्याच्या आत प्रवेश करण्यासाठी प्रतिक्षेत असल्याची माहिती त्यांनी पुढे दिली आहे. तर, आफ्रिकेच्या टोकाला वळसा मारून दक्षिणेकडे जाण्यासाठी आतापर्यंत 15 जहाजांनी गर्दी केली असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. 

याव्यतिरिक्त, सुएझ कालव्यातील (Suez Canal) जहाजांच्या सध्याच्या परिस्थितीनुसार वाहतूक नीट होण्यासाठी पुढचे सहा दिवस किंवा त्याहून अधिक कालावधी लागू शकेल, अशी पुस्ती त्यांनी जोडली आहे. तर अजून एका शिपिंग कंपनीच्या अधिकाऱ्याने ही घटना अलिकडच्या वर्षांत जागतिक व्यापाराला बसलेल्या सर्वात मोठ्या अडथळ्यापैकी एक असल्याचे म्हटले आहे. या अधिकाऱ्याने माध्यमाला दिलेल्या माहितीनुसार, सुएझ कालव्यातील अडकलेले जहाज निघालेले असले तरी, काही बंदरांवर येणाऱ्या जहाजांची संख्या वाढून नवीन मोठीच समस्या उद्भवण्याची शक्यता असल्याचे मत नोंदवले आहे. तसेच, या गोष्टीमुळे चालू वर्षातील पुढील तीन महिने अधिक विस्कळीत आणि त्याहून आगामी वर्षाच्या अखेरीस मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता असल्याचे मत त्यांनी वर्तविले आहे. 

दरम्यान, कोरोनाच्या (Corona) महामारीमुळे कंटेनर शिपिंग कंपन्या मागील काही दिवसांपासून मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागत आहे. तर युरोपियन आणि अमेरिकन कंपन्यांना सुएझ कालव्यातील झालेल्या घटनेमुळे उत्पादन केलेल्या सामानाची साठवणूक करणे मोठे कठीण जाणार असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.       

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com