‘मिसेस श्रीलंका’ विजेतीचं मुकुट हिसकावणाऱ्या परिक्षकाला अटक

‘मिसेस श्रीलंका’ विजेतीचं मुकुट हिसकावणाऱ्या परिक्षकाला अटक
Examiner arrested for snatching crown of Mrs Sri Lanka winner

नुकत्याच पार पडलेल्या ‘मिसेस श्रीलंका’ स्पर्धेतील एक अजब व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला होता. या स्पर्धेमध्ये पुष्पिका डी सिल्वा हिला 'मिसेस श्रीलंका' म्हणून विजेते घोषीत केले होते. परंतु नंतर काही वेळातच एक अजबच घटना घडली. तिच्याकडून विजेतेपदाचा मुकुट हिसकावून घेण्यात आला. त्यानंतर पुष्पिकाने परिक्षकांविरोधात पोलिस तक्रार केली.

मिसेस श्रीलंका 2019 चा किताब पटकावणारी कॅरोलिन परिक्षक म्हणून सहभागी झाली होती. तिने पुष्पिकाला 'मिसेस श्रीलंका' घोषीत केल्यानंतर मुकुट घातला होता. पण नंतर ती अचानक मंचावर आली आणि तिने पुष्पिकाला परिधान केलेला विजेता पदाचा मुकुट हिसकावून घेतला. पुष्पिका ही घटस्फोटीत असल्याचे म्हणत कॅरोलिनाने तिला अपात्र घोषीत करत विजेतापदाचा मुकुट उपविजेतीला घातला. मिसेसे श्रीलंका ही स्पर्धा ही केवळ विवाहीत महिलांसाठीच असल्याचे कॅरोलिनाने म्हटले. (Examiner arrested for snatching crown of Mrs Sri Lanka winner)

परंतु पुष्पिकाने सोशल मिडियावर पोस्ट करत मी घटस्पोटीत महिला नाही असं या पोस्टमध्ये म्हटले आहे. 'जर त्यांना वाटत असेल तर मी घटस्फोटाचे कागद आणून दाखवते. मी माझ्या पतीपासून वेगळी झाले आहे मात्र आमचा घटस्फोट झालेला नाही’ असे म्हटले होते.

झूमने दिलेल्य़ा वृत्तानुसार, कोलंबो पोलिसांनी कॅरोलिनाला पुष्पिकाचा विजेतापदाचा मुकुट हिसकावत तिचे केस खेचल्याप्रकरणी अटक केली आहे. पोलिसा अधिकारी अजित रोहाना यांनी या संबंधी माहीती देताना म्हटले, आम्ही परिक्षक आणि तिचा सहकारी चुला मनमेंद्रला मारहाण आणि नेलम पोकुना (थेएटर)  नुकसानीच्या आरोपाखाली अटकेत घेतले आहे. 
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com