रक्तात गाठी होण्याच्या संदर्भात अ‍ॅस्ट्राझेनेकाने दिले स्पष्टीकरण

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 15 मार्च 2021

काही देशांमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी रक्तात गाठी होण्याच्या लोकांच्या तक्रारीमुळे अ‍ॅस्ट्राझेनेका लसीचा वापर स्थगित केला होता. 

लसीकरण केलेल्या लोकांच्या रक्तात गाठी होण्याच्या संदर्भात कोणत्याही स्वरुपाचा धोका नसल्याचे स्पष्टीकरण अ‍ॅस्ट्राझेनेकाने दिले आहे. अ‍ॅस्ट्राझेनेकाकडून युरोपियन युनियन आणि युकेमधील लसीकरण झालेल्या 17 दशलक्षाहून अधिक व्यक्तींच्या आरोग्य अहवालाचे परिक्षण करण्यात आले आहे. त्यावरुन त्यांनी या संबंधीचा निष्कर्ष काढला आहे. काही देशांमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी रक्तात गाठी होण्याच्या लोकांच्या तक्रारीमुळे अ‍ॅस्ट्राझेनेका लसीचा वापर स्थगित केला होता. 

आयर्लंड, डेन्मार्क, नॉर्वे, आइसलॅंड, आणि नेदरलॅंड या देशातील आरोग्य अधिकाऱ्यांनी अ‍ॅस्ट्राझेनेकाचा लस घेतलेल्या लोकांच्या रक्तात गाठी निर्माण झालेच्या मुद्द्यावरुन य़ा लसींचा वापर स्थगित केला आहे. ऑस्ट्रिया या देशानेही अ‍ॅस्ट्राझेनेका लसींची एक बॅच गेल्या आठवड्यात वापरणे थांबवले होते. आणि कोग्युलेशन डिसॉर्डरमुळे झालेल्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

Quad summit: भारतीय लस उत्पादक कंपन्यांना अमेरिका आर्थिक मदत करणार

युरोपीयन मेडिसीनने म्हटले आहो की, जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या लसीकरणामुळे या घटना घडल्या आहेत असे कोणत्याही स्वरुपाचे पुरावे नाहीत. त्यावर औषध निर्माते, डीप व्हेन थ्रोम्बोसिसच्या 15 घटना आणि पलमोनरी एम्बोलिझमच्या 22 घटना आत्तापर्य़ंत नोंदवल्या गेल्या आहेत. जे की, इतर परवानाकृत लसींप्रमाणेच आहेत.

अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनीने म्हटले आहे की, युरोपीयन आरोग्य अधिकाऱ्यांनी अतिरिक्त चाचण्या घेतलेल्या आहेत. घेतलेल्या चाचण्यांमध्य़े कोणतीही चिंता करण्याचे कारण दिसून आले नाही. मासिक अहवाल पुढच्या आठवड्यामध्ये EMA वेबसाइटवर लोकांच्या खात्रीसाठी प्रदर्शित करण्यात येणार आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या सहाय्याने अ‍ॅस्ट्राझेनेका लस तयार करण्यात आली आहे. ही लस युरोपियन युनियन आणि बऱ्याच देशांमध्ये वापरण्यासाठी अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. मात्र अद्याप पर्यंत अमेरिकेने अ‍ॅस्ट्राझेनेकाला अधिकृत मान्यता दिलेली नाही. 
 

संबंधित बातम्या