चिनी अधिकारी थांबलेल्या पाकिस्तानमधील हॉटेलमध्ये स्फोट; ५ जणांचा मृत्यू

दैनिक गोमंतक
गुरुवार, 22 एप्रिल 2021

बुधवारी रात्री अकराच्या सुमारास पाकिस्तानच्या क्वेटा शहरात मोठा स्फोट झाला. 

बुधवारी रात्री अकराच्या सुमारास पाकिस्तानच्या क्वेटा शहरात मोठा स्फोट झाला. क्वेटा मधील सर्वात मोठे हॉटेल सेरेनाच्या पार्किंगमध्ये हा स्फोट झाला. आतापर्यंत पाच जण ठार झाले आहेत. ज्या हॉटेलमध्ये हा स्फोट झाला त्या ठिकाणी चीनी अधिकारी थांबले होते. शहरातील सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मृतांची संख्या जास्त असू शकते, कारण बहुतांश जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. गेल्या अनेक दिवसांपासून येथे हिंसाचार होत असल्याने शहरातील अनेक भाग सैन्यदलाकडे देण्याची तयारी सुरू असल्याचे माध्यमातील रिपोर्टमध्ये म्हटले आहे. (An explosion at a hotel in Pakistan where Chinese officials are staying; 5 killed)

टेस्ला कारच्या ऑटोपायलट मोडवर झालेल्या अपघातावर अ‍ॅलॉन मस्क यांनी दिली...

33 जण जखमी
पाकिस्तानच्या एका माध्यमाच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या वेळी बरेच लोक पार्किंगमध्ये उपस्थित होते. हे लोक एका सोहळ्यात सहभागी होण्यासाठी येथे आले होते. यात काही परदेशी नागरिक देखील होते. अहवालात असे सांगितले गेले आहे की सुमारे 33 लोक जखमी झाले असून बहुतेकांची प्रकृती गंभीर आहे. यामागचे कारण असे की बहुतेक लोक कळपांमध्ये एकत्र बोलत होते.

बॉम्बचा स्फोट की दुसरं काही 
बलुचिस्तानमध्ये बऱ्याच काळापासून स्वातंत्र्याची मागणी निर्माण होत आहे. बंडखोरांचे गट  पाकिस्तानी सैन्याच्या चौकींवर हल्ले करत आहेत आणि त्यात बरेच सैनिक ठार झाले आहेत. अलिकडच्या काळात येथे रेंजर्स आणि विशेष बटालियनही तैनात करण्यात आले आहेत. असे असूनही, हिंसाचार कमी झाला नाही. या स्फोटात सात मोटारी पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत. हा बॉम्बस्फोट होता की दुसरे काही हे अद्याप समजू शकलेले नाही.

असा झाला इस्राईल कोरोना मुक्त; वाचा सविस्तर 

बलूचिस्तान सरकारने स्फोटाची पुष्टी केली आणि मृतांची संख्या 4 असल्याचे सांगितले. सरकारच्या निवेदनात म्हटले आहे - हा दहशतवादी हल्ला आहे की दुसरं काही आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांनीही घटनेची पुष्टी केली. आम्ही प्रकरणाच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न करू. दहशतवादाचा सामना करण्यासाठी संपूर्ण देश एकवटलेला आहे असे रशीद म्हणाले. 

संबंधित बातम्या