नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; लंडनच्या न्यायालयाने प्रत्यार्पणावर केले शिक्कामोर्तब  

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 25 फेब्रुवारी 2021

भारतातील फरार असलेला हिरे व्यापारी नीरव मोदीला पुन्हा देशात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

भारतातील फरार असलेला हिरे व्यापारी नीरव मोदीला पुन्हा देशात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लंडन मधील वेस्टमिनिस्टर न्यायालयाचे दंडाधिकारी सॅम्युअल गुजी यांनी आवाज नीरव मोदीवर खटला चालवण्यासाठी भारतात प्रत्यार्पण करण्याचे आदेश दिले आहेत. नीरव मोदीच्या भारतातील हस्तांतराच्या याचिकेवर दाखल करण्यात आलेले आक्षेप न्यायालयाने फेटाळले आहेत. तसेच भारतातील न्याययंत्रणा ही निष्पक्ष असल्याचे देखील वेस्टमिनिस्टर न्यायालयाचे नमूद केले आहे. 

नीरव मोदीच्या सुनावणीवेळेस भारत सरकारने मांडलेल्या आश्वासनाबाबत लंडनच्या वेस्टमिनिस्टर न्यायालयाने समाधान व्यक्त केले. त्यामुळे आता नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर या निर्णयावर नीरव मोदी पुनर्विचार याचिका दाखल करू शकतो. व भारतात त्याचे प्रत्यार्पण झाल्यास त्याला मुंबईतील आर्थर जेलमध्ये ठेवले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. शिवाय यानंतर न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर अंतिम मंजुरीसाठी हे प्रकरण ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीती पटेल यांच्याकडे जाईल. व त्यांनी यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. 

चीनचा अजब दावा; राष्ट्राध्यक्ष जिनपिंग म्हणाले...

नीरव मोदीच्या प्रत्यार्पण सुनावणीवेळेस, वेस्टमिनिस्टर न्यायालयाच्या न्यायाधीशांनी नीरव मोदीला भारतातील मुंबई मधील आर्थर रोड जेल मध्ये पर्याप्त वैद्यकीय आणि मानसिक आरोग्य सेवा दिली जाणार असल्याचे निकालाच्या वेळेस सांगितले. व तसेच नीरव मोदीकडून दाखल करण्यात आलेले आक्षेप देखील न्यायाधीशांनी फेटाळले. नीरव मोदी सध्या लंडनच्या वॅन्ड्सवर्थ कारागृहात तुरूंगात आहे आणि त्याचे भारतात हस्तांतर करण्याचा खटला लंडन मधील वेस्टमिनिस्टर न्यायालयात सुरु आहे.     

दरम्यान, नीरव मोदीला 19 मार्च 2019 मध्ये प्रत्यर्पण वॉरंटच्या संदर्भात लंडन मध्ये अटक करण्यात आली होती. भारतात नीरव मोदीच्या विरोधात दोन खटले सुरु आहेत. एक पंजाब नॅशनल बँकेच्या फसवणुकीबाबत केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग तपास करत आहे. तर दुसरा खटला मनी लॉन्ड्रींग प्रकरणीचा असून, सक्तवसुली संचालनालय याबाबत तपास करत आहे. पंजाब नॅशनल बँकेची 15 हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप  नीरव मोदीवर आहे.        

संबंधित बातम्या