Mark Zuckerberg यांनी पत्नीसह फोटो शेअर करत दिली खुशखबर, म्हणाले- पुढच्या वर्षी...

Mark Zuckerberg New Baby : फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्या घरी लवरच पाळणा हलणार आहे.
Mark Zuckerberg
Mark Zuckerberg Instagram

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले मार्क झुकेरबर्ग यांनी (Mark Zuckerberg) शोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर करून आपल्या आयुष्यातील मोठी बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्यांनी स्वतः इंस्टाग्राम फोटो शेअर करत त्यांनी गोड बातमी दिली आहे. झुकरबर्गने पत्नी प्रिसिला चॅनसोबतचा एक फोटो शेअर करून आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

झुकेरबर्गची पत्नी प्रिसिला चॅनला पुढील वर्षी बाळ होणार आहे. ती एका मुलाची आई होईल. झुकरबर्गने एका इंस्टाग्राम (Instagram) पोस्टमध्ये लिहिले, “खूप प्रेम. पुढील वर्षी मॅक्स आणि ऑगस्टला नवीन बहीण मिळत आहे हे सांगताना आनंद झाला!"

Mark Zuckerberg
चीनमध्ये वेगाने वाढतेय वृद्धांची संख्या, 2035 पर्यंत होणार 40 कोटी

पोस्टमध्ये शेअर केलेल्या फोटोमध्ये (Photo) झुकरबर्ग आणि चॅन खूप आनंदी दिसत आहेत. दोघेही हसताना दिसत आहेत. फोटोमध्ये झुकेरबर्ग चॅनच्या पोटावर हात ठेवत आहे. अशाप्रकारे तो आपल्या घरी एक छोटा सदस्य येणार असल्याचे संकेत देत आहे. झुकेरबर्गच्या या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. त्यांच्या पोस्टला तासाभरात दोन लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

मार्क झुकरबर्ग आणि प्रसिला चॅन यांची लव्हस्टोरी

मार्क झुकेरबर्ग त्याच्या काही मित्रांमार्फत प्रिसिला चॅनला पहिल्यांदा भेटले होते. त्यावेळी ते कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला होते. दोघांनी 2003 मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. मार्क आणि प्रसिला यांनी 19 मे 2012 रोजी लग्न केले. प्रास्किला चॅन या मेडिकलच्या विद्यार्थिनी होत्या आणि त्या कॅलिफोर्निया विद्यापीठ, सॅन फ्रान्सिस्कोची पदवीधर आहे.

झुकेरबर्गला दोन मुली आहेत. ज्यांची नावे मॅक्सिमा चॅन झुकरबर्ग आणि ऑगस्ट चॅन झुकरबर्ग आहेत. दोघींचा जन्म अनुक्रमे 2015 आणि 2017 मध्ये झाला होता. झुकेरबर्ग दाम्पत्य चॅन झुकरबर्ग इनिशिएटिव्ह नावाचे एक परोपकारी व्यासपीठ चालवते. दोघांचे म्हणणे आहे की ते या उपक्रमात फेसबुकच्या शेअर्समधील 99 टक्के मालमत्ता गुंतवतील.

श्रीमंतांच्या यादीत झुकेरबर्ग आता या क्रमांकावर

मेटा प्रमुख झुकेरबर्ग या वर्षी जागतिक आर्थिक मंदीला बळी पडले. ब्लूमबर्गच्या मते, 2022 मध्ये झुकरबर्गची एकूण संपत्ती सुमारे $71 अब्जांनी कमी झाली आहे. फोर्ब्सनुसार, 38 वर्षीय झुकरबर्ग आता जगातील श्रीमंतांच्या यादीत 22 व्या क्रमांकावर आहे. सध्या त्यांची एकूण संपत्ती 52.3 अब्ज डॉलर आहे. 2021 मध्ये त्याने श्रीमंतांच्या यादीत तिसरे स्थान पटकावले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com