लाइव्ह स्ट्रीमिंगमध्ये वापरा कॉपीराइट म्युझिक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

फेसबुक गेमिंग कंपनीने नुकताच एक करार करत ‘लाइव्ह स्ट्रीमिंग’मध्ये कॉपीराइट असलेल्या म्युझिकचा वापर करण्यास त्यांच्या भागीदार स्ट्रीमर्सना परवानगी दिली आहे.

माउंटन व्ह्यू: फेसबुक गेमिंग कंपनीने नुकताच एक करार करत ‘लाइव्ह स्ट्रीमिंग’मध्ये कॉपीराइट असलेल्या म्युझिकचा वापर करण्यास त्यांच्या भागीदार स्ट्रीमर्सना परवानगी दिली आहे. यामुळे कॉपीराइट असलेल्या म्युझिकचा वापर करण्याबाबत कडक नियम असलेल्या ‘ट्वीच’सारख्या प्लॅटफॉर्मवर लाइव्ह स्ट्रीमिंग करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

‘ट्वीच’ हा प्लॅटफॉर्म ॲमेझॉन कंपनीने उपलब्ध करून दिला आहे. लाइव्ह स्ट्रीमिंगसाठी या प्लॅटफॉर्मचा वापर करताना त्या कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी त्यांची मालकी असलेले किंवा परवाना असलेले म्युझिक वापरणे बंधनकारक आहे. अनेक स्ट्रिमर पार्श्वसंगीत म्हणून कॉपीराईट असलेल्या म्युझिकचा वापर करतात, पण ते ‘ट्वीच’च्या नियमांच्या विरोधात आहे आणि जून महिन्यापासून अशा कार्यक्रमांवर कारवाई होत आहे. या पार्श्वभूमीवर फेसबुकने नवा करार करत स्ट्रिमरना मोठा दिलासा दिला आहे. याबाबत ब्लॉगद्वारे माहिती देताना फेसबुक गेमिंगने सांगितले की,‘‘आम्ही म्युझिक उद्योगाबरोबर भागीदारी करत असून आमच्या भागीदार असणाऱ्यांसाठी लोकप्रिय म्युझिकचा खजिनाच खुला करत आहोत. 

संबंधित बातम्या