म्यानमारमधील चालू घडामोडीनंतर ब्रिटिश फॅशन ब्रँड नेक्स्टने घेतला मोठा निर्णय

next.jpg
next.jpg

म्यानमारच्या सैन्याने 1 फेब्रुवारी रोजी तेथील नागरी सरकार उलथवून टाकले आणि सत्तेवर असणाऱ्या आंग सॅन सु की यांच्यासह देशातील अनेक लोकशाही समर्थक नेत्यांना ताब्यात घेतले आहे. या सगळ्या घटनांनंतर सैन्याने म्यानमारमध्ये आता एक वर्षासाठी आणीबाणी जाहीर केली आहे. तर निदर्शने करणाऱ्या म्यानमारच्या नागरिकांवर बेछूट गोळीबार करण्यात आला, ज्यामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे.(Famous fashion brand Next has stopped imports from Myanmar) 

म्यानमारच्या सैन्याने म्यानमार मधील लोकशाही सरकार उलथून टाकल्यानंतर जगभरातून या घटनेचा निषेध व्यक्त केला जातो आहे. याच पार्श्वभूमीवर ब्रिटिश फॅशन रिटेलर  नेक्स्ट (Next)  या  प्रसिद्ध कंपनीने फेब्रुवारीमध्ये घडलेल्या सैन्य अत्याचाराच्या घटनेनंतर म्यानमारमध्ये नवीन उत्पादन ऑर्डर देणे थांबवित असल्याचे म्हटले आहे. नेक्स्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सायमन वुल्फसन यांनी याबातची माहिती दिलेली आहे. ब्रिटीश फॅशन रिटेलर नेक्स्टचे  कार्यकारी अधिकारी सायमन वुल्फसन यांनी आपण यापुढे म्यानमार मध्ये उत्पादन तयार करण्याच्या ऑर्डर देणे थांबवत असल्याचे स्पष्ट केले.तसेच हे एक मोठे  पाऊल  असल्याचे म्हणत, म्यानमारमधून घेत असलेलया उत्पादनांना पर्याय म्हणून इतर देशांकडे पाहत असल्याचे नमूद केले.  नेक्स्टच्या एकूण उत्पादनांपैकी 5 टक्क्यांपेक्षा कमी उत्पादन हे म्यानमार मध्ये तयार केले जात होते, असेही त्यांनी पुढे सांगितले.

दरम्यान, म्यानमार मध्ये सत्तापालट (Military Coup)  झाल्या नंतर मोठ्या राजकीय हालचाली घडताना दिसत आहे. म्यानमारच्या (Myanmar) रस्त्यांवर एका बाजूला निर्दशने करणारे लोक,आणि दुसऱ्या बाजूला सशस्र जवान हे चित्र निर्माण झालं आहे. अहिंसक मार्गाने निर्दर्शने करणाऱ्या लोकांवर म्यानमार सैन्याने केलेल्या गोळीबारात शेकडो लोक ठार झाल्याचे समजते आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com