Snake Farming: 'या' देशात उपचारसाठी केला जातो सापांच्या विषाचा वापर

चीनमध्ये अनेक त्वचारोग आणि आजारांवरही सापाच्या विषाने उपचार केले जातात.
Snakes
SnakesDainik Gomantak

भारतासह अनेक देशाची अर्थव्यवस्था ही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, चक्क सापांचीही शेती केली जाते. चीनमधील लोक लाखांच्या संख्येने विषारी सापांची शेती करतात. चीनमध्ये (China) एक असे गाव आहे जेथे प्रत्येक वर्षी 30 लाखाहून अधिक विषारी साप पाळले जातात. जिसिकियाओ या गावात सापांची अशी अनोखी शेती केली जाते. येथे स्नेक फार्मिंग लोकांच्या उत्पन्नाचा मुख्य साधन आहे. मिळालेल्या माहितीनुसार या गावाची लोकसंख्या जवळपास एक हजार इतकी आहे. एक व्यक्ती प्रत्येक वर्षी जवळपास 30 हजार सापांचे पालन करतो. आश्चर्य वाटेल की या गावातील सापांना अमेरिका, रशिया, दक्षिण कोरिया, जर्मनी यांसारख्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

चीममध्ये सापांची शेती करणाराने लोक कोबरा, अजगरा आणि विषारी वायपर सारख्या सापांच्या प्रजातींचे पालन करतात. या गावातील लोक सापांना अजिबात घाबरत नाही. पण स्थानिक लोक 'फाइव्ह स्टेप' स्नेक या एकाच सापाला घाबरतात. हा साप चावल्यावर माणूस केवळ पाच पाउले चालू शकतो आणि मरण पावतो म्हणून याला 'फाइव्ह स्टेप' स्नेक असे दिले आहे.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे लोक सापांचे (Snakes) पालन करतातच, पण सापांची पैदासही करतात. साप पालनासाठी लहान काचेच्या किंवा लाकडी पेटीत सापांची पिल्ले पाळली जातात. हिवाळ्यात, सापाच्या अंड्यांमधून सापाची अंडी बाहेर पडतात आणि काही काळानंतर ते प्रौढ होतात, त्यानंतर ते प्लास्टिकच्या पिशव्यामध्ये पॅक केले जातात आणि अमेरिका, रशिया, दक्षिण कोरिया, जर्मनी सारख्या देशांमध्ये विकले जातात. 

Snakes
Volodymyr Zelensky: युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या कारला भीषण अपघात

का केली जाते सापांची शेती?

चीनमधील लोक सापाचे मास आणि त्याच्या शरीराचे अन्य अवयव विकतात. तसेच या लेकांना सापाचे मास खायला आवडते. तसेच सापांच्या अवयवांचा वापर औषधे बनवण्यासाठी देखिल केला जातो.

काय करतात या सापांचे?

जिसिकियाओ गावात सापांशिवाय चहा, कापुस, ताग इतर प्रकारची शेतीही केली जाते. पण हे गाव जगात सापांच्या शेतीसाठी प्रसिध्द झाले आहे. या छोट्या गावात शेकडो स्नेक फॉर्म्स आहेत. स्थानिकांनी सांगितले की, सापांना फार्म हाउसमधून कत्तलखान्यात आणल्यानंतर सर्वात आधी त्यांचे विष काढले जाते. त्यानंतर सापांचे मुंडके कापले जाते. त्यानंतर सापांना कापून त्यांच्या मासांचे तुकडे वेगळे ठेवले जाते. त्यानंतर सापाचे कातडे काढून उन्हात वाळवले जाते. सापांचे मांस खाण्यासाठी तसेच औषधनिर्मितीसाठी केले जाते. कत्तलखान्यातून पिशव्या भरून सापांचे मांस बाजारात विक्रीसाठी नेले जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com