कॅनडात महात्मा गांधींचा बर्फाचा पुतळा, 2022 मध्ये होणार अनावरण; पाहा PHOTO

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 22 मार्च 2021

कॅनडामधील आयकॉनिक हॉटेलमध्ये राष्ट्र्पीता महात्मा गांधी यांचा सात फूट उंच बर्फाचा पुतळा बसविला आहे. कॅनडाच्या क्युबेक प्रांतातील हॉटेल डी गलेस यांनी शुक्रवारी भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त हा पुतळा बसविला आहे.

कॅनडा: कॅनडामधील आयकॉनिक हॉटेलमध्ये राष्ट्र्पीता महात्मा गांधी यांचा सात फूट उंच बर्फाचा पुतळा बसविला आहे. कॅनडाच्या क्युबेक प्रांतातील हॉटेल डी गलेस यांनी शुक्रवारी भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त हा पुतळा बसविला आहे. ज्याचे 15 ऑगस्ट, 2022 रोजी अनावरण केले जाणार आहे. टोरोंटो येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने बर्फात तयार करण्यात आलेल्या या पुतळ्याचे फोटो शेअर केले आहे.

आझादी का अमृत महोत्सव
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हा पुतळा जगभरात नेत्रदिपक शिल्पकला कौशल्य म्हणून ओळखल्या जाणार्‍या प्रसिद्ध कॅनेडियन बर्फ शिल्पकार मार्क लेपियर यांनी तयार केला आहे. गांधीजींचा हा पुतळा अवघ्या पाच तासात तयार करण्यासाठी लेपियरने बर्फाचे पाच ब्लॉक वापरले. लेपिएर यांनी बर्फाचा पुतळा तयार केला तेव्हा टोरंटोमधील भारतीय सरकारचे प्रतिनिधी आणि टोरंटोमधील राजदुतावासातील जनरल अपूर्व श्रीवास्तव तेथे उपस्थित होते. 

भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त गांधीजींचा पुतळा करण्यासाठी भारतीय वाणिज्य दूतावासाने आयकॉनिक हॉटेलला विनंती केली होती. हॉटेलने ही विनंती मान्य केली आणि त्यांच्या एका उत्कृष्ट शिल्पकाराला पुतळा तयार करण्याचे काम दिले. उत्तर अमेरिकेतील एकमेव बर्फाचं हॉटेल अशी डी ग्लेस हॉटेलची जगभरात ख्याती आहे.

75 व्या भारतीय स्वातंत्र्यासाठी भारताची योजना

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारने देशातील स्वातंत्र्याच्या  75 वा वर्धापन दिन "आझादी का अमृत महोत्सव" च्या रूपात देश आणि जगभरात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली सरकारने एक राष्ट्रीय समिती स्थापन केली आहे. देशाच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या मते, महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात असलेल्या मीठ सत्याग्रहाच्या 91 व्या वर्धापन दिनानिमित्त हा उत्सव 12 मार्च 2021 रोजी सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.

संबंधित बातम्या