Kyle Gordy: कॅलिफोर्नियाचा विकी डोनर! 31 व्या वर्षी 57 मुलांचा बाप, जगाच्या कानाकोपऱ्यात आहेत मुलं

कॅलिफोर्निया येथील एका 31 वर्षीय व्यक्तीने तो 2-4 नव्हे तर तब्बल 57 मुलांचा बाप असल्याचे त्याने सांगितले आहे.
Kyle Gordy
Kyle GordyDainik Gomantak

एखाद्या व्यक्तीला 8-10 मुलं असतील तर ते ऐकून आपण थक्क होतो. पण एका व्यक्तीला तब्बल 57 मुले आहेत असे कोणी तुम्हाला कोणी सांगितले तर त्यावर तुमचा विश्वास बसेल? नाही ना. पण अशी एक बातमी सध्या खूप व्हायरल (Viral News) होत आहे.

कॅलिफोर्निया येथील एका 31 वर्षीय व्यक्तीने तो 2-4 नव्हे तर तब्बल 57 मुलांचा बाप असल्याचे त्याने सांगितले आहे. या व्यक्तीचे मुले जगाच्या वेगवेगळ्या देशांमध्ये विखुरलेली आहेत. असेही त्याने सांगितले. विशेष म्हणजे या व्यक्तीची ही कथा अतिशय रंजक आहे.

Kyle Gordy
China Corona Update: चीनमध्ये कोरोनाचा कहर! 80 % लोकसंख्या बाधित, हाजारो मृत्यू; यंत्रणा हाय अलर्टवर

अलिकडे अनेकजण वंध्यत्वाच्या समस्येला तोंड देत आहेत. अशा लोकांसाठी विविध प्रकारचे वैद्यकीय उपचार उपलब्ध आहेत. आपल्या देशात फारसं नाही, पण परदेशात अशा केससाठी पर्याय म्हणून स्पर्म डोनेशनचा उपाय सांगितला जातो.

स्पर्म डोनेट करून अनेकजण पैसेही कमावतात. यावर 'विकी डोनर' नावाचा एक हिंदी चित्रपट देखील आला होता. आपण ज्या 57 मुलांबद्दल बोलत आहोत तो व्यक्ती देखील एक स्पर्म डोनर आहे. त्याने स्वत:च सोशल मीडियावर याबद्दल सांगितले आहे. (biological father of 57 children by donating sperm)

केल गार्डी (Kyle Gordy) असे या 31 वर्षीय युवकाचे नाव आहे. तो अमेरिकेतील (California City, USA) कॅलिफोर्नियामध्ये राहतो. त्याने स्वतः सोशल मीडियावर आपल्या स्पर्म डोनेशनच्या प्रवासाबद्दल सांगितले आहे.

Kyle Gordy
Power Outage In Pakistan: पाकिस्तान अंधारात! मेट्रो, बाजारपेठा ठप्प; सरकारने केली लोकांना 'ही' विनंती

केलच्या म्हणण्यानुसार, तो हे काम मागील 9 वर्षांपासून करत आहे आणि आतापर्यंत त्याने 48 महिलांना आई होण्यास मदत केली आहे. त्याच्या रेकॉर्डमुळे त्याला सीरियल स्पर्म डोनर देखील म्हटले जाते.

त्याची मुले वेगवेगळ्या देशात आहेत. केल काही दिवसांपूर्वी ब्रिटन आणि फ्रान्सला गेला होता, जिथे त्याने 3 महिलांसाठी शुक्राणू दान केले, जे आता गर्भवती आहेत. 57 मुलांचा जैविक पिता असणारा केल लवकरच आणखी 14 मुलांचा बाप होणार आहे.

स्पर्म डोनेशनच्या कामामुळे केल वैयक्तिक आयुष्यात देखील अनेक समस्यांचा सामना करत आहे. तो इतक्या मुलांचा बाप आहे हे मुलींना कळताच त्या त्याला सोडून जातात. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, यासाठी केल दररोज 10 तास झोप घेतो आणि स्वत:ला तणावापासून दूर ठेवतो. कोणत्याही प्रकारचा संसर्ग होणार नाही याचीही काळजी तो घेतो. केल स्पर्म वाया जाऊ नये म्हणून शारीरिक संबंध देखील टाळतो असे त्याने म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com