ऑस्ट्रेलियन संसदेत हिजाब परिधान करणाऱ्या फातिमा पेमन ठरल्या पहिल्या महिला

फातिमा पेमन सोमवारी ऑस्ट्रेलियाच्या संसदेत हिजाब परिधान करणाऱ्या पहिल्या मुस्लिम महिला ठरल्या आहेत.
Fatima payman
Fatima paymanDainik Gomantak

फातिमा पेमन (Fatima payman) सोमवारी ऑस्ट्रेलियाच्या संसदेत हिजाब परिधान करणाऱ्या पहिल्या मुस्लिम महिला ठरल्या आहेत. एबीसी न्यूजनुसार, पेमन यांनी पश्चिम ऑस्ट्रेलियातील सहाव्या सिनेटच्या जागेवर दावा केला, ज्याने मजूर पक्षाला उर्जितावस्था आली. (Fatima payman becomes first Muslim woman to wear hijab in Australian senate)

सर्वात तरुण सिनेटर

पेमन (27 वर्षीय) या ऑस्ट्रेलियन सिनेटच्या इतिहासातील तिसऱ्या सर्वात तरुण सिनेटर आहेत. माध्यमाशी बोलताना त्यांनी सांगितले की, 'मी आधी अफगाण मुस्लिम महिला (Women) आहे. मी ऑस्ट्रेलियन लेबर पक्षाची सिनेटर आहे. त्याचबरोबर मी सर्व ऑस्ट्रेलियन नागरिकांचे प्रतिनिधित्व करते. त्या पुढे म्हणाल्या की, 'मी माझ्या लोकांसह सर्वांचे प्रतिनिधित्व करेन.' हिजाब (Hijab) घालण्याच्या कल्पनेने निवडणूक सामान्य होण्यास मदत होईल, अशी आशाही पेमन यांनी व्यक्त केली.

Fatima payman
रशियाला दक्षिण युक्रेनवर कब्जा करू देणार नाही - वोलोदिमिर झेलेन्स्की

वयाच्या आठव्या वर्षी अफगाणिस्तानातून आले

पेमन पुढे म्हणाल्या की, 'हिजाब परिधान करण्याचा निर्णय हा केवळ मीडियामध्ये इस्लामाफोबियाचा प्रसार झाला आहे म्हणून नाही. ज्या तरुण मुलींनी हिजाब घालण्याचा निर्णय घेतला त्यांना तो घालण्याचा पूर्ण अधिकार आहे.' पेमन या आठ वर्षांचे असताना आपल्या कुटुंबासह अफगाणिस्तानातून (Afghanistan) ऑस्ट्रेलियाला आल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com