Vladimir Putin: 'या' आजाराच्या भीतीने पुतिन गर्लफ्रेंडसोबत बंकरमध्ये बसले दडून...

पुतिन यांना कॅन्सर असल्याचा पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांचा दावा
President Vladimir Putin girlfriend
President Vladimir Putin girlfriendDainik Gomantak

Vladimir Putin: रशियामध्ये सध्या एका आजाराचा सर्वत्र प्रसार होऊ लागला आहे. अनेकजण या आजाराला बळी पडू लागले आहेत. रशियन राज्यकारभाराचे केंद्र असलेले 'क्रेमलिन' हे ठिकाणही त्याला अपवाद राहिलेले नाहीत. त्यामुळेच या आजाराच्या भीतीने खुद्द राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन देखील एका बंकरमध्ये दडून बसल्याचे सांगितले जात आहे.

President Vladimir Putin girlfriend
OIC : ओआयसीने पाकिस्तानच्या आतंकवाद पसरवण्याच्या अजेंड्यापासून दूर राहावे-भारताने फटकारले

विशेष म्हणजे, पुतिन यांची कथित गर्लफ्रेंड अलिना कावेवा ही देखील या बंकरमध्ये पुतिन यांच्यासमवेत आहे. 39 वर्षीय अलिना ही पुतिन यांची राजकीय सल्लागार देखील आहे.

रशियात दहशत माजवणारा हा आजार आहे फ्लू. 'मेट्रो' या ब्रिटीश वेबसाइटवरील माहितीनुसार, रशिया आणि विशेषतः क्रेमलिनमध्ये फ्लूचा प्रसार वेगाने होत आहे. हे टाळण्यासाठी पुतिन एका बंकरमध्ये राहायला गेले आहेत. नेहमी वर्षाखेरीस रशियाचे राष्ट्राध्यक्ष पत्रकार परिषद घेत असतात, ती पत्रकार परिषदही यंदा पुतिन घेणार नसल्याचे समजते. याशिवाय नववर्षाच्या कोणत्याही सेलिब्रेशनमध्ये ते सहभागी होणार नाहीत. पुतिन यांचे जवळचे सहकारी दिमित्री पेस्कोव्ह यांनी देखील कबूल केले की क्रेमलिनमध्ये फ्लू वेगाने पसरत आहे.

दरम्यान, पुतीन यांना कॅन्सर झाल्याचा दावा पाश्चिमात्य प्रसारमाध्यमे बऱ्याच दिवसांपासून करत आहेत. अलीकडेच एका बातमीमध्ये पुतिन हे मॉस्को येथील त्यांच्या घरी पडून त्यांच्या पाठीला दुखापत झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुतिन हे एका वैद्यकीय चाचणी प्रयोगशाळेला भेट देताना दिसले होते.

President Vladimir Putin girlfriend
China Taiwan Tension: चीनची 18 अण्वस्त्रवाहु विमाने घुसली तैवानच्या हद्दीत

रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पाश्चिमात्य माध्यमांनी पुतिन यांना कॅन्सर असून त्यांची तब्येत खूपच खराब असल्याचा दावा अनेकदा केला आहे. पुतिन यांना पार्किन्सन्स आजार असल्याचेही काही प्रसारमाध्यमांनी यापुर्वी म्हटले होते. दरम्यान, युक्रेनविरूद्धच्या युद्धात युक्रेनचे पारडे जड होत असल्याने पुतिन लोकांच्या नजरेतून दूर जात असल्याचेही म्हटले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com