न्यूयॉर्कच्या सुपरमार्केटमध्ये अंदाधुंद गोळीबारात 10 जणांचा मृत्यू

बफेलो येथील एका सुपरमार्केटमध्ये शनिवारी दुपारी अनेकांना गोळ्या घालण्यात आल्या.
न्यूयॉर्कच्या सुपरमार्केटमध्ये अंदाधुंद गोळीबारात 10 जणांचा मृत्यू
police Dainik Gomantak

अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील बफेलो येथील एका सुपरमार्केटमध्ये शनिवारी दुपारी अनेक जणांवर गोळीबार करण्यात आला. पोलिसांनी सांगितले की, बंदूकधारी व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. टॉप फ्रेंडली मार्केटमध्ये झालेल्या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाला. गव्हर्नर कॅथी हॉचुल यांनी ट्विट केले की ती त्यांच्या मूळ गावी बफेलो येथील किराणा दुकानातील घटनेबाबत अधिकाऱ्यांच्या ते संपर्कात आहेत आणि या प्रकरणाची चौकशी करणे सुरू आहे. (New York Firing)

बफेलोचे पोलिस आयुक्त जोसेफ ग्रामाग्लिया यांनी सांगितले की, गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याने हेल्मेट घातले होते. त्यांनी मृतांची संख्या 10 आणि तीन जण जखमी असल्याचे सांगितले. बळी पडलेल्यांपैकी बहुतांश लोकं कृष्णवर्णीय होते. बंदूकधाऱ्याने सुपरमार्केटच्या पार्किंगमध्ये प्रथम चार जणांवर गोळ्या झाडल्या, त्यातील तिघांचा मृत्यू झाला, नंतर आत जाऊन गोळीबार सुरू केली ज्यात इतरांचा मृत्यू झाला, अशी प्राथमिरक माहिती पोलीस आयुक्त जोसेफ ग्रामाग्लिया यांनी दिली.

police
Sri Lanka Crisis: महिंदा राजपक्षे यांच्या अटकेची मागणी तीव्र!

स्टोअरमध्ये मारल्या गेलेल्यांमध्ये सशस्त्र सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या निवृत्त पोलिस अधिकाऱ्याचा समावेश आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर शूटरने त्याच्या मानेवर बंदूक ठेवली, पण त्याच्याशी बोलणे झाले आणि शेवटी त्याने आत्मसमर्पण केले.

police
माझ्याविरोधात बंद खोलीत षडयंत्र रचले जात आहे : इम्रान खान

एफबीआयच्या बफेलो फील्ड ऑफिसचे प्रभारी विशेष एजंट स्टीफन बेलोंगिया यांनी सांगितले की, गोळीबाराचे कारण द्वेष असण्याची शक्याता आहे. या प्रकरणाचा आणखी कसून तपास केला जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.