
Guyana Fire: दक्षिण अमेरिकन देश गुयानामधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथील शाळेच्या वसतिगृहाला लागलेल्या आगीत 20 जणांचा मृत्यू झाला आहे.
त्याचबरोबर डझनभर लोक जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरु आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या घटनेपासून अनेक मुले बेपत्ता आहेत. मात्र, जखमींची संख्या अद्याप कळू शकलेली नाही.
दरम्यान, ज्या शाळेच्या (School) वसतिगृहात आग लागली ते गुयानामधील महदिया शहरामध्ये आहे. मात्र आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
त्याचबरोबर, मृतांची संख्या 20 असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात वाढही होऊ शकते. मृतांमध्ये बहुतांश मुले आहेत. आगीमुळे हे सर्वजण वसतिगृहात अडकले होते.
याबाबत माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'रविवारी मध्यरात्री वसतिगृहात अचानक आग लागली. आग (Fire) लागली तेव्हा मुले झोपलेली होती.'
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'खराब हवामानामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. जखमी मुलांना राजधानी जॉर्जटाऊनमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.' दुसरीकडे, गुयानाचे अध्यक्ष इरफान अली यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
अत्यंत वेदनादायक आणि भीषण अपघात, असे या घटनेचे वर्णन अध्यक्षांनी केले. या वेदनांची मी कल्पनाही करु शकत नाही, असेही ते म्हणाले.
त्याचवेळी, स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी मुलांना एअर अॅम्ब्युलन्सद्वारे जॉर्जटाऊनला नेण्याची योजना आखली जात आहे. पाच विमानेही घटनास्थळी पोहोचली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसतिगृहात मोठ्याप्रमाणात विद्यार्थी अडकले आहेत, ज्यांच्या किंकाळ्या ऐकू येत आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.