India-Iran Relations: 3 वर्षे इराणच्या कैदेत असलेले नाविक आज परतणार भारतात; पीएम मोदींना मागितली होती मदत

India-Iran Relations: इंडियन वर्ल्ड फोरमच्या अध्यक्ष पुनीत सिंह चंडोक यांनी पंतप्रधान मोदींना नाविकांच्या स्थितीबद्दल सांगितले होते
India-Iran Relations:
India-Iran Relations:Dainik Gomantak

India-Iran Relations: इराणमध्ये 400 दिवसांपेक्षा जास्त दिवस कैद असणारे पाच नाविक आज मुंबईत परतणार आहेत. इराणने या नाविकांना फेब्रुवारी 2020मध्ये कैद केले होते. त्यानंतर 9 मार्च 2021मध्ये कोणताही आरोप सिद्ध न झाल्याने त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली होती.

मात्र त्यानंतरदेखील इराणने त्यांची कागदपत्रे परत न केल्याने हे नाविक भारतात परत येऊ शकले नाहीत.

नाविकांनी व्हिडिओ बनवत पंतप्रधान मोदींकडे मदत मागितली होती. या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही वतनवापसीसाठी तुमच्याकडे मदत मागत आहोत असे म्हटले होते. आम्ही इराणच्या चाबहार बंदराच्या जवळ आहोत असे या व्हिडिओमध्ये म्हटले होते.

India-Iran Relations:
Eggs Import: 'या' देशात पुन्हा अन्नटंचाई! भारतातून मागवली 20 लाख अंडी

याआधी इंडियन वर्ल्ड फोरमच्या अध्यक्ष पुनीत सिंह चंडोक यांनी पंतप्रधान मोदींना नाविकांच्या स्थितीबद्दल सांगितले होते. नाविकांच्या परिवाराने दिल्ली हायकोर्टात आपली ओळख सिद्ध करणारे कागदपत्रे दाखवत भारतीय( India ) कायद्यानुसार मदत मागितली होती.

दरम्यान, आता तीन वर्षानंतर हे नाविक आपल्या घरी परतत असून आपल्या कुटुंबियांना भेटणार आहेत. भारत सरकार आणि वर्ल्ड फोरम यांच्याकडून त्यांना मदत केली जात आहे. हे नाविक मुंबईतील असून त्यांच्यावर इराणमध्ये नशिल्या पदार्थाची तस्करी केल्याप्रकरणी इराण सरकारने त्यांना पकडले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com