लंडनहून दिल्लीत आलेल्या विमानातील 5 जणांना कोरोनाची लागण ; कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे सतर्कतेचा इशारा

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 डिसेंबर 2020

काल रात्री एअर इंडियाच्या विमानाने लंडनहून दिल्ली विमानतळावर दाखल झालेल्या विमानामधील 266 प्रवाशांपैकी 5 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.

नवी दिल्ली :  काल रात्री एअर इंडियाच्या विमानाने लंडनहून दिल्ली विमानतळावर दाखल झालेल्या विमानामधील 266 प्रवाशांपैकी 5 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये विमान क्रू सदस्यांचादेखाल समावेश आहे. या नागरिकांचे नमुने. चे नमुने संशोधनासाठी एनसीडीसीकडे पाठविण्यात आले असून नागरिकांना आरोग्य केंद्रात ठेवण्यात आले आहे. हे नागरिक भारतात ब्रिटनहून आले जिथे नव्या प्रकारच्या कोरोनाचा प्रसार सुरू झाला असून, हा कोरोनाचा नवा प्रकार सुपर स्प्रेडर असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे या नागरिकांबाबत प्रशासनाकडून जास्त सतर्कता बाळगली जात आहे. ब्रिटनमधील नव्या कोरोनाविषाणूचा प्रकार समोर आल्यानंतर भारत सरकारने ब्रिटनहून येणाऱ्या विमानांवर तात्पुरत्या स्वरूपाची बंदी घातली आहे. ही बंदी 31 डिसेंबर पर्यंत कायम राहणार आहे.

 

कोरोनाचा नवा प्रकार आला समोर ; घाबरू नका, पण काळजी घ्या! 

 

ब्रिटनमध्ये संक्रमित झालेला नवा कोरोना विषाणू हा 70 टक्के अधिक वेगाने पसरतो, अशी माहिती ब्रिटनमधील तज्ज्ञांनी दिली आहे. आत्तापर्यंत 40 हून अधिक देशांनी ब्रिटनला जाणाऱ्या विमानवाहतूकीवर बंदी घातली आहे. इटलीत देखील नव्या कोरोनाविषाणूच्या स्ट्रेनचा रूग्ण सापडला आहे. त्याचप्रमाणे सौदी अरेबिया, कुवैत, साल्वाडोर, अर्जेन्टिना, चिली, मोरोक्को, बेल्जियम, फिनलँड, स्वित्झर्लंड, बल्गेरिया, रोमानिया, क्रोएशिया, उर्वरित युरोप या  देशांच्या सुद्धा सीमा बंद करण्यात आल्या आहेत.

 

अधिक वाचा :

नव्या कोरोनामुळे ब्रिटन पडले एकाकी; शेजारील देशांनी सीमा केल्या बंद

नोपाळमध्ये जाहीर झालेली मुदतपूर्व निवडणुक पंतपधान ओली यांना अमान्य

‘अल-जझीरा’वर सायबर हल्ला ; सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीचा हात असल्याचा

संबंधित बातम्या