चीनमध्ये पुरामुळे हाहाकार

PTI
मंगळवार, 14 जुलै 2020

आतापर्यंत पुरामुळे १४० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे किंवा बेपत्ता झाले आहेत.

बीजिंग

चीनमध्ये गेल्या महिन्यापासून पुराने हाहाकार माजविला असून आतापर्यंत पुरामुळे १४० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे किंवा बेपत्ता झाले आहेत. या पुरामुळे चीनमधील जवळपास चार कोटी जणांना फटका बसला असून हजारो घरांचे नुकसान झाले आहे.
चीनमध्ये अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असल्याने सरकारने पुराच्या धोक्याची पातळी तिसऱ्या स्तरावरून दुसऱ्या स्तरावर वाढविली आहे. चीनमधील एकूण ४३३ नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून त्यातील ३३ नद्यांनी पुराचा उच्चांक गाठला आहे. चीनमधील सर्वांत मोठ्या पोयांग सरोवरही पूर्ण भरले आहे. चीनचे अध्यक्ष शी जिंगपिंग यांनी बचावकार्याचा आढावा घेतला आहे.

पुराचा फटका
४३३ : नद्यांना पूर
१४१ : मृत्यू अथवा बेपत्ता
२७ : प्रांतांमध्ये हाहाकार
३.७ कोटी : जणांना फटका
२.२४ लाख : जणांना हलविले
२८ हजार : घरांचे नुकसान

संबंधित बातम्या