Food Crisis in Pakistan: पाकिस्तानमध्ये खाण्यापिण्याचे वांदे! धान्य मिळवण्यासाठी झालेल्या चेंगरांचेंगरीत चार ठार

पाकिस्तानमध्ये आर्थिक संकटासोबत अन्न टंचाई देखील निर्माण झाली आहे.
Pakistan Food Crisis
Pakistan Food CrisisDainik Gomantak

Food Crisis in Pakistan: पाकिस्तानमध्ये संकट काही संपण्याचे नाव घेत नाही आहे. या सोबतच अन्न धान्याची टंचाई देखील देशात निर्माण झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती देखील गगनाला भिडल्या आहेत.

यामुळे नागरिकांना दोन वेळेचे जेवण मिळवणे देखील कठीण झाले आहे. यामुळे देशात अनेक ठिकाणी मोफत धान्य वाटप केले जात आहेत. हे धान्य मिळवण्यासाठी नागरिकांची झुंबड उडत आहे.

परिणामी चेंगराचेंगरी सारख्या घटना देखील समोर येत आहेत. अशीच एक घटना पंजाब प्रांतात घडली असून मोफत धान्य घेण्यासाठी झालेल्या गर्दीत चेंगरा-चेंगरी झाल्याने 4 नागरिक ठार झाले आहेत.

पंजाब प्रांतात सरकारी वितरण केंद्रांवर मोफत धान्य देण्यात येत आहेत. याच ठिकाणी अचानक गर्दी जमल्याने चेंगरा चेंगरी झाली. यात चार वृद्ध नागरिकांचा मृत्यू झाला.

वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिकांचे हाल होत आहेत. यामुळे पंजाब प्रांतात मोफत धान्य वाटप कार्यक्रम राबविला जात आहे.

मुलतान, मुजफ्फरगड, आणि पैसलाबाद या ठिकाणी हे मोफत धनी वाटले जात आहे. या ठिकाणी धान्य घेत असतांना चार नागरिक ठार झाले तर अनेक नागरिक बेशुद्ध झाले. वितरण केंद्रावर असलेल्या असुविधांमुळे या घटना घडल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

Pakistan Food Crisis
'India चे पंतप्रधान ओबीसी समाजातून येतात...', सफाई कामगाराच्या मुलीने परदेशात उंचावले देशाचे नाव

काही ठिकाणी नागरिकांची झुंबड उडल्याने झालेल्या चेंगराचेंगरीत तर काही ठिकाणी रांगेत तासंतास उभे राहावे लागल्याने नागरिकांचा मृत्यू झाला.

एका ठिकाणी पोलिसांनी नागरिकांना रांगेत ठेवण्यासाठी लाठीचार्ज केला. नागरिकांनी या सरकारी वितरण केंद्रांवर गैरसोय असल्याचा तसेच कमी धान्य मिळत असल्याचा आरोप केला.

  • 26 वस्तूंच्या किमती वाढल्या 

गेल्या आठवडाभरात पाकिस्तानमध्ये 26 वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत तर 12 वस्तूंच्या किमती कमी झाल्या आहेत. तर 13 वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. टोमॅटोचा दर 71.77 टक्के, गव्हाच्या पिठाचा भाव 42.32 टक्के, बटाट्याचा भाव 11.47 टक्के, केळी 11.07 टक्के, ब्रँडेड चहा 7.34 टक्के, साखर 2.70 टक्के, डाळ मॅश 1.57 टक्के आणि गुळाचा भाव 1.03 टक्के वाढला आहे.

  • या गोष्टींच्या किंमतीत घसरण

ज्या वस्तूंच्या किमतीत घसरण झाली त्यात चिकनचे मांस 8.14%, मिरची पावडर 2.31%, LPG 1.31%, मोहरीचे तेल 1.19%, लसूण 1.19%, स्वयंपाकाचे तेल 0.21%, कडधान्ये यांचा समावेश आहे. मूग 0.17%, मसूर 0.15% आणि अंडी 0.03% वाढली आहेत.

  • सर्वात महाग वस्तू 

वर्षभरात कांद्याच्या भावात सर्वाधिक 228.28 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यानंतर सिगारेटच्या किमतीत 165.88 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पहिल्या तिमाहीत गव्हाच्या पिठात 120.66 टक्के, गॅसच्या किमतीत 108.38 टक्के आणि डिझेलच्या किमतीत 102.84 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ग्राउंड मिरचीची सर्वात मोठी 9.56 टक्के घट आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com