Exclusive: भारत-पाक परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच आमने-सामने, 'संबंध सुधारण्यावर भर'

Dr. S Jaishankar & Bilawal Bhutto: पाकिस्तानमध्ये इम्रान सरकार पायउतार झाल्यानंतर शाहबाज शरीफ सरकार सत्तेत आले.
Bilawal Bhutto  & Dr. S Jaishankar
Bilawal Bhutto & Dr. S JaishankarDainik Gomantak

India-Pak Relation: पाकिस्तानमध्ये इम्रान सरकार पायउतार झाल्यानंतर शाहबाज शरीफ सरकार सत्तेत आले. यातच आता भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची प्रथमच भेट झाली आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांची उझबेकिस्तानमध्ये SCO परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेदरम्यान भेट झाली.

दरम्यान, उझबेकिस्तानमधील SCO शिखर परिषदेदरम्यान भारत (India) आणि पाकिस्तानचे (Pakistan) परराष्ट्र मंत्री एकमेकांना भेटले असल्याची पुष्टी भारत सरकारच्या सूत्रांनी केली आहे. तथापि, सूत्रांनी असेही स्पष्ट केले की, 'भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणतीही द्विपक्षीय शिष्टमंडळ चर्चा झाली नाही.'

Bilawal Bhutto  & Dr. S Jaishankar
पाकिस्तान लष्करप्रमुखांनी कर्जासाठी मागितली अमेरिकेची मदत

तसेच, परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर (S Jaishankar) आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी (Bilawal Bhutto Zardari) यांच्यात सौजन्यपूर्ण भेट झाली. दोघांनीही हस्तांदोलन केले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्यांनी एकमेकांकडे दुर्लक्ष न करण्याचा निर्णय घेतला. कारण अनेक प्रसंगी भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री एकमेकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करताना दिसून आले आहेत.

दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहेत

सरकारमधील विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे की, भारतालाही नेबर फर्स्ट या धोरणानुसार पाकिस्तानशी संबंध सुधारायचे आहेत, मात्र त्यासाठी पाकिस्ताननेही पोषक वातावरण तयार केले पाहिजे. एकीकडे, पाकिस्तानचे लष्करप्रमुख किंवा परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो काही सकारात्मक बोलतात, तेव्हा सरकारच्या इतर भागांतून परस्परविरोधी विधाने येतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत सरकारला निश्चितच वाटते की, सध्याचे शरीफ सरकार भारतासोबतचे संबंध आणि विशेषत: व्यापारी संबंध सुधारु इच्छित आहेत, परंतु या सरकारला केवळ एक वर्षाचा कालावधी आहे.

Bilawal Bhutto  & Dr. S Jaishankar
श्रीलंकेने भारताकडे पुन्हा मागितली 500 दशलक्ष डॉलरची मदत

शाहबाज शरीफ यांची अडचण काय?

भारतासोबतचे संबंध सुधारण्यासाठी त्यांनी दोन पावले पुढे टाकली पाहिजे. इम्रान खान सध्याच्या शाहबाज शरीफ सरकारच्या विरोधात जाणाऱ्या निवडणुका लक्षात घेता त्यासाठी त्यांची खरडपट्टी काढतील, अशी भीतीही त्यांना असेल. अशा परिस्थितीत भारत-पाकिस्तानमधील संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तान सरकारने सर्वसमंतीने बोलणे आणि संबंध सुधारण्यासाठी धोरण मांडणे सर्वात महत्त्वाचे आहे.

कशावर सहमती झाली आहे?

सूत्रांकडून मिळालेली माहितीनुसार, भारत आणि पाकिस्तानमध्ये सहमती झाली आहे की, दोन्ही देशातील संपर्क पुन्हा एकदा वाढवला पाहिजे. यासोबतच दोन्ही देशांच्या तुरुंगात बंदिस्त असलेल्या कैद्यांचीही सुटका करुन त्यांना आपापल्या देशात परत पाठवण्यात आले पाहिजे. दुसरीकडे, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी अलीकडेच अनेक धार्मिक स्थळांसाठी व्हिसा मंजूर केला आहे. एकमेकांच्या तुरुंगात बंद असलेल्या अनेक कैद्यांचीही सुटका करण्यात आली आहे.

Bilawal Bhutto  & Dr. S Jaishankar
अंधारमय बनला पाकिस्तान, वीज संकटाचा करावा लागतोय सामना

संयुक्त न्यायिक समिती पुन्हा सुरु होईल

मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच दोन्ही देशांनी एकमेकांच्या तुरुंगातील कैद्यांना भेटण्यासाठी, त्यांची स्थिती जाणून घेण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी स्थापन केलेली संयुक्त न्यायिक समिती पुन्हा कार्यान्वित केली जाईल. यासंदर्भात दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरु आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com