विदेशी मुलीने गिटारवर गायली प्रशंसनिय हनुमान चालीसा, पाहा व्हिडिओ

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. 'ssunnyy36' नावाच्या पेजवर तुम्ही सर्वजण हा व्हिडिओ ऐकू शकता.
विदेशी मुलीने गिटारवर गायली प्रशंसनिय हनुमान चालीसा, पाहा व्हिडिओ
Foreigner girl sing Hanuman Chalisa video viral on social mediaDainik Gomantak

सोशल मीडिया (Social Media) हे असे व्यासपीठ आहे की, जिथे काहीही व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. असे काही व्हिडिओ आहेत जे पाहिल्यानंतर तुम्हाला ते पुन्हा पुन्हा पहायला आवडतात. काही काळापूर्वी देखील असाच एका व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एक मुस्लिम तरुण महाभारताचे शीर्षकगीत गाताना दिसत होता.

आता आणखीन एक असाच व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होताना पाहायला मिळत आहे. आणि हा व्हिडिओ इतका सुंदर आहे की सोशल मीडियावर प्रत्येकालाच तो पुन्हा पुन्हा ऐकावा आणि पाहावा वाटत आहे. हा व्हिडिओ आहे हनुमान चालीसेचा (Hanuman Chalisa). तुम्ही हनुमान चालीसा अनेकदा ऐकली असेल आणि तुम्हाला ती चांगली आठवत असेल. मात्र हा व्हिडिओ जरा खास आहे कारण या व्हिडिओमध्ये चक्क एक विदेशी तरुणी अतिशय सुंदर पद्धतीने हनुमान चालीसाचे पठण करताना दिसत आहे.(Foreigner girl sing Hanuman Chalisa video viral on social media)

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. 'ssunnyy36' नावाच्या पेजवर तुम्ही सर्वजण हा व्हिडिओ ऐकू शकता. व्हिडिओ शेअर करताना पेजच्या अॅडमिनने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'हनुमान चालिसा' हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या इतर पेजवर देखील शेअर करण्यात आला आहे, तसेच या विडोला लोक खूप प्रतिक्रिया देत आहेत. आणि त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळत आहे.

व्हायरल होत असलेला हा पाच मिनिटांचा व्हिडिओ अप्रतिम आहे. या व्हिडिओमध्ये एक विदेशी मुलगी दिसत आहे, ज्यामध्ये तिचा आउटफिट देखील जबरदस्त दिसत आहे, आणि चक्क ती गिटारवर हनुमान चालीसा गाताना दिसत आहे.या परदेशी तरुणीचा आवाज आणि स्टाइलला नेटकरी खूपच दाद देत आहेत .

Foreigner girl sing Hanuman Chalisa video viral on social media
अबब! जगातील सर्वात लांब सर्व सोयीनीयुक्त दहा मजली कार

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com