चीनने ‘या’ कारणासाठी दिला माजी बॅंकरला मृत्यूदंड

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 30 जानेवारी 2021

भ्रष्टाचाराचा आरोप असणाऱ्या चीन मधील एका बॅंकरला चीनने मृत्यूदंडाची शिक्षा दिली आहे. या अधिकाऱ्याने 1.8 बिलीयन युआनची लाच स्वीकारली असल्याचा त्याच्यावरील आरोप सिध्द झाला होता.

बिजींग: भ्रष्टाचाराचा आरोप असणाऱ्या चीन मधील एका बॅंकरला चीनने मृत्यूदंडाची शिक्षा दिली आहे. या अधिकाऱ्याने 1.8 बिलीयन युआनची लाच स्वीकारली असल्याचा त्याच्यावरील आरोप सिध्द झाला होता. या बॅंकरला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आल्याची पुष्टी चीनमधील सरकारी माध्यमांनी केली आहे. मृत्यूदंड देण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव ली शिऑमीन आहे. तो निवृत्त होण्यापूर्वी चीनमधील मोठ्या कंपनीत तो अध्यक्ष पदावर कार्यरत होता. शिऑमीन यांना तिआनजीन शहरामध्ये मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली असल्याची बातमी चायना सेन्ट्रल टेलिव्हीजनने दिली.   

‘’ली शिऑमीन लाच रुपात स्वीकारलेली रक्कम खूप मोठ्या स्वरुपाची होती. ज्या परिस्थितीत शिऑमीन यांनी ही रक्कम स्वीकारली हा त्यांचा मोठा अपराध होता. याचा समाजावर मोठा परिणाम होऊ शकतो.’’ असे चीनमधील सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटले. शिऑमीन यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्याय़ालयाने यावेळी फेटाळून लावली. ली यांनी पदावर असताना आपल्या पदाचा गैरवापर केला असल्याचेही न्यायालयाने यावेळी निर्देशित केले आहे. शिऑमीन यांना मृत्यूदंड देण्यात आल्याची कोणालाही माहिती देण्यात आली नाही. मात्र शिक्षा देण्यापूर्वी त्यांच्या नातेवाईकांना भेटण्याची परवानगी देण्यात आली होती. मृत्यूदंडाची शिक्षा अगदी गंभीर गुन्हा असणाऱ्या व्यक्तीनांच देण्यात येते.

इस्त्रायल दुतावास स्फोट: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची इस्त्रायलच्या विदेश...
तर दुसरीकडे चीनमध्ये दर वर्षी किती लोकांना मृत्यूदंडासारखी शिक्षा दिली जाते याबद्दल चीन कधीच आकडेवारी जाहीर करत नाही. मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल या संस्थेने यापूर्वीही सांगितले आहे की, ''चीनमध्ये मोठ्य़ाप्रमाणात दरवर्षी मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते. जगात चीन मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येणाऱ्या देशांच्या क्रमांकात चीन पहिल्या स्थानी येतो. चीन आपल्या देशातील नागरिकांना गंभीर अपराध सिध्द झाल्यानंतर मृत्यूदंडासारखी कठोर शिक्षा चीन देतो. मात्र त्यासंबधीची आकडेवारी कधीच प्रकाशित करत नाही''.

संबंधित बातम्या