पाकिस्तानच्या माजी सैन्य अधिकाऱ्यानेच केलं इम्रान सरकारचं वस्त्रहरण

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

 अलीकडे एका टीव्ही चॅनेलवरील चर्चेदरम्यान लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त) अमजद शोएब यांनी इम्रान ला नाकारा आणि नालायक असे संबोधीत केले आहे.

इस्लामाबाद: कधीकाळी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षात पाहिले गेलेल्या माजी सैन्य अधिकाऱ्यांनीही त्यांचा कडाडून विरोध करण्यास सुरवात केली आहे. इम्रान सरकारच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्न उपस्थित होत आहेत. अलीकडे एका टीव्ही चॅनेलवरील चर्चेदरम्यान लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त) अमजद शोएब यांनी इम्रान ला नाकारा आणि नालायक असे संबोधीत केले आहे. मात्र सैन्याच्या या माजी अधिकाऱ्याने जमात-उद-दावाचा मुख्य सूत्रधार हाफिज सईदचा बचाव केला आहे.

अमजद शोएब हे पाकिस्तानचे एक प्रसिद्ध नाव आहे. ते देशातील जवळजवळ प्रत्येक वृत्तवाहिनीवरील सैन्य आणि परराष्ट्र धोरणातील तज्ज्ञ म्हणून बोलतांना दिसतात. शोएब स्वत: चे यूट्यूब चॅनेलही चालवतात. याआधी ते खुलेआम इम्रान आणि सैन्याचा बचाव करीत आले आहेत.

हाफिज सईदचे प्रकरण
एका प्रश्नाचे उत्तर देतांना शोएब म्हणाले, अमेरिकेने हाफिज सईदच्या नावावर बक्षीस जाहीर केले आहे. त्यांचा एजंट रेमंड डेव्हिसला त्यांनी येथे पाठवले. त्याच्यामार्फत त्याला मुंबई हल्ल्यात हाफिज सईदच्या भूमिकेचा पुरावा शोधायचा होता, परंतु त्यांना काहीही मिळाले नाही. वास्तविक भारताच्या दबावाखाली हाफिज सईदचे प्रकरण जिवंत ठेवले आहे.

आम्ही स्वतः इतरांना संधी देतो
एका प्रश्नाचे उत्तर देतांना माजी सैन्य अधिकारी म्हणाले, "गेल्या वर्षी अमेरिकेने आमच्या हबीब बँकेचे सर्व व्यवहार संशयावरून थांबवले होते. समस्या देशाच्या आत आहे. हबीब बँक आणि इतर संस्थेच्या माध्यामातून अमेरिका कारवाई करते, आपल्या देशात का नाही. आम्ही कोणाला शिक्षा का केली नाही? आम्ही इतके गुन्हे केले आहेत, याचा कोणालाही हिशेबदेखील देता येत नाही."

हुकूमत एका व्यक्तीची गुलाम आहे

शोएबने इम्रानचे नाव न घेता खूप खरीखोटी सुनावली. "सत्य हे आहे की, हुकूमत एक नाकारा आणि नालायक अयोग्य माणसाच्या हाती देण्यात आली आहे. किंवा असे म्हणता येईल की, सरकार गुलाम झाले आहे. संपूर्ण जग आपल्या देशासाठी काम करीत आहे आणि हे सरकार या नालायक माणसासाठी काम करत आहे. हे आमचे पंतप्रधान आहेत असे लोकांना पटवून देण्यात आले आहे. जे नेते आपल्या देशासाठी काम करतात त्यांचा स्वत: चा वैयक्तिक अजेंडा किंवा जात नसते. त्यांच्यात पिढ्यान् पिढ्यांसाठी काहीतरी करायची इच्छा आहे. आमची डिप्लोमैसी फ्लॉप आहे कारण आमच्या वजीर-ए-आजमला काहीही माहित नसते. अशा माणसाची तुलना तूम्ही नरेंद्र मोदींशी कशी करू शकता?" असे वक्तव्य शोएब यांनी केले आहे.

भगवद्गीता आणि पंतप्रधान मोदींचा फोटो घेऊन नवा उपग्रह अंतराळात झेपावणार -

संबंधित बातम्या