''कायपण करीन'', भेटवस्तू विकल्याच्या आरोपावर इम्रान खान यांचा घसरला तोल

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी तोषखान्यातील भेटवस्तूंच्या विक्रीवरुन निर्माण झालेल्या वादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Imran Khan
Imran KhanDainik Gomantak

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी तोषखान्यातील भेटवस्तूंच्या विक्रीवरुन निर्माण झालेल्या वादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. इम्रान खान (Imran Khan) यांनी स्पष्टपणे सांगितले की, 'या भेटवस्तू आमच्याच आहेत, त्यामुळे या भेटवस्तू सोबत ठेवायच्या की नाही हा निर्णय वैयक्तिक माझा आहे.' जिओ न्यूजच्या रिपोर्टनुसार, इम्रान खान म्हणाले, 'माझ्या भेटवस्तू, माझी इच्छा'. (Former Pakistani Prime Minister Imran Khan has reacted to a controversy over the sale of gifts)

दरम्यान, पाकिस्तानच्या (Pakistan) कायद्यानुसार, परदेशी मान्यवरांकडून मिळालेली कोणतीही भेटवस्तू डिपॉझिटरी किंवा तोषखान्यात ठेवली पाहिजे. सोमवारी इम्रान खान यांनी तोषखान्यातील भेटवस्तू विकल्याच्या पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाजच्या (PML-N) आरोपांवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, विरोधी पक्षाचे आरोप निराधार आहेत कारण "तोषखान्यातून जे काही विकले गेले" याची नोंद आहे.

Imran Khan
इम्रान खान पाकिस्तान सोडून भारतात का जात नाहीत?; विरोधकांचा निशाणा

तोषखान्यातून जे काही घेतले ते रेकॉर्डवर : इम्रान खान

विरोधकांकडून करण्यात आलेले आरोप फेटाळून लावत इम्रान खान म्हणाले की, ''मी माझ्या निवासस्थानी राष्ट्रपतींनी पाठवलेल्या भेटवस्तू जमा करुन ठेवल्या आहेत. मी तोषखान्यातून जे काही घेतले ते रेकॉर्डवर आहे. मी खर्चाच्या 50% रक्कम भरल्यानंतर भेटवस्तू खरेदी केल्या.''

इम्रान खान म्हणाले, 'मला पैसे कमवायचे असते तर मी माझे घर कॅम्प ऑफिस म्हणून घोषित केले असते, परंतु मी तसे केले नाही. ARY न्यूज पाकिस्तानने खान यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, "मी देवाचा आभारी आहे की, तीन वर्षात (Government) त्यांना माझ्याविरुद्ध फक्त तोषखानातील भेटवस्तूसंबंधी खटला मिळाला, ज्याची माहिती आधीच उपलब्ध आहे."

Imran Khan
''...काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पाकिस्तान तयार''

काय आहे संपूर्ण प्रकरण?

तोषखान्यातील भेटवस्तू विकण्याचे प्रकरण गेल्या आठवड्यात समोर आले होते. पाकिस्तानचे नव निर्वाचित पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी म्हटले होते की, 'इम्रान खान यांनी त्यांच्या कार्यकाळात दुबईतील तोषखान्यातून तब्बल 14 कोटी रुपयांच्या भेटवस्तू विकल्या.'

स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, माजी पंतप्रधान इम्रान खान यांना त्यांच्या साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात जागतिक नेत्यांकडून 14 कोटींहून अधिक किमतीच्या 58 भेटवस्तू मिळाल्या होत्या. त्या सर्व भेटवस्तू त्यांनी पैसे न देता ठेवल्या आणि विकल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com