इम्रान खान यांनी परत केले भारताचे कौतुक

अमेरिकेच्या दबावाला बगल देत भारताने तेल खरेदी केल्यामुळे खान भारतावर खुश आहेत.
Imran Khan
Imran Khan Dainik Gomantak

रशियाकडून कमी किमतीत तेल खरेदी केल्याबद्दल पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी शनिवारी भारताचे कौतुक केले. अमेरिकेच्या दबावाला बगल देत भारताने तेल खरेदी केल्यामुळे खान भारतावर खुश आहेत. (Former PM of Pakistan Imran Khan praises India again)

Imran Khan
Quad Summit 2022: PM मोदी राहणार उपस्थित, क्वाड म्हणजे काय अन् चीन का घाबरतो?

याबाबत खान यांनी पाकिस्तान सरकारवर निशाणा साधला. त्यांनी आपल्या देशातील पाकिस्तान मुस्लिम लीग (एन) च्या नेतृत्वाखालील सरकारला योजनेशिवाय काम करणे थांबवण्याचा सल्ला दिला.

शेजारील देशाचे माजी पंतप्रधान खान यांची ही प्रतिक्रिया भारत सरकारने पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 9.5 रुपये आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांनी कपात केल्यानंतर आली आहे. इम्रान खान यांनी ट्विटमध्ये लिहिले की, क्वाडचा भाग असूनही, अमेरिकेच्या दबावाला न जुमानता भारताने जनतेला दिलासा देण्यासाठी रशियाकडून अनुदानित दराने तेल खरेदी केले. हेच आमचे सरकार स्वतंत्र परराष्ट्र धोरणाच्या मदतीने साध्य करण्याचे काम करत होते.

Imran Khan
स्कॉट मॉरिसन युगाचा अस्त, अँथनी अल्बानीज होणार ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान

इमरान खान म्हणाले की, 'मीर जाफर आणि मीर सादिक तुम्ही बाहेरच्या दबावाला बळी पडला आणि आता नियोजन न करता चारही दिशांना तेलासाठी इकडे तिकडे भटकत आहात.' माजी पंतप्रधानांनी ट्विट केले की आमच्या सरकारसाठी पाकिस्तानचे हित सर्वोच्च आहे, परंतु दुर्दैवाने स्थानिक मीर जाफर आणि मीर सादिक सत्ता परिवर्तनासाठी बाह्य दबावाला बळी पडले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com