ओबामांनी ''ड्रीम्स फ्रॉम माई फादर'' मध्ये केला होता साराचा उल्लेख

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 30 मार्च 2021

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांची सावत्र आजी सारा ओबामा यांचे निधन झाले आहे. त्या 99 वर्षांच्या होत्या. आम्हाला त्याची खूप आठवण येईल, असे म्हणत ओबामांनी सारा सोबतचा त्यांचा तरूणपणाचा फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे.

नैरोबी: अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांची सावत्र आजी सारा ओबामा यांचे निधन झाले आहे. त्या 99 वर्षांच्या होत्या. ओबामा यांच्या नातेवाईक आणि अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली. अद्याप त्याच्या मृत्यूचे कोणतेही कारण सांगितले गेले नाही. सारा या एक समाजसेवीका होत्या. मुली आणि अनाथ मुलांच्या शिक्षणासााठी त्या प्रोत्साहन देत होत्या. साराची मुलगी मसरत ओनियांगो यांच्या म्हणण्यानुसार, पश्चिम केन्यामधील किसुमू येथील जारामोगी ओगींगा ओडिंसा शिक्षण आणि रेफरल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्यांनी स्थानिक वेळेनुसार पहाटे चार वाजता अखेरचा श्वास घेतला.

सारा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या आजोबांची दुसरी पत्नी होती. माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांना साराबद्दल खूप प्रेम होते आणि त्यांच्या "ड्रीम्स फ्रॉम माय फादर" या संस्मरणात त्यांनी साराचा "ग्रॅनी" असा उल्लेखही केला होता. 1998  मध्ये ओबामा केनियाला गेले तेव्हा त्यांनी साराबरोबर झालेल्या भेटीचा उल्लेख केला. त्यांना “मामा सारा” म्हणून अनेकजन ओळखतात. त्याचबरोबर त्याची “दानी” किंवा ग्रॅनी म्हणून देखिल ओळख होती.

हार्ट ऑफ एशिया परिषदेला आजपासून सुरवात; अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर होणार चर्चा 

"मी आणि माझे कुटुंब आमच्या लाडक्या आजी सारा, यांच्या जाण्याने दु: खी आहोत. आम्हाला त्याची खूप आठवण येईल, असे म्हणत ओबामांनी सारा सोबतचा त्यांचा तरूणपणाचा फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे.

 

संबंधित बातम्या