अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री डोनाल्ड रम्सफेल्ड यांचे निधन

अमेरिकेचे (America) दोनवेळा परराष्ट्रमंत्री (Minister of Foreign Affairs) पद भूषवलेले डोनाल्ड रम्सफेल्ड (Donald Rumsfeld) यांचे मंगळवारी निधन झाले. ते 88 वर्षाचे होते.
Donald Rumsfeld
Donald RumsfeldDainik Gomantak

वॉशिंग्टन : अमेरिकेचे (America) दोनवेळा परराष्ट्रमंत्री (Minister of Foreign Affairs) पद भूषवलेले डोनाल्ड रम्सफेल्ड (Donald Rumsfeld) यांचे मंगळवारी निधन झाले. ते 88 वर्षाचे होते. आधुनिक अमेरिकी लष्कराचे द्रष्टे आणि एक कुशल नोकरशहा म्हणून त्यांनी लैकिक मिळवला होता. मात्र इराकमध्ये (Iraq) दीर्घकाळ चाललेल्या युध्दाने त्यांच्या या प्रतिमेला गालबोट लावले होते. रम्सफेल्ड यांचे वर्णन चार माजी सहकाऱ्यांनी चलाख आणि तितकेच आक्रमक, देशभक्त, राजकियदृष्ट्या धूर्त असे केले होते. त्यांनी चार अध्यक्षांच्या हाताखाली सरकारमध्ये तर जवळपास 25 वर्षे कॉर्पेरेट जगतामध्ये काम केले आहे. तसेच सैनिकांच्या कुटुबींयांना सेवा पुरवणे आणि मदत करण्यासाठी त्यांनी 'रम्सफेल्ड फाऊंडेशन' (Rumsfeld Foundation) ची स्थापनाही केली होती.

Donald Rumsfeld
चीनी कम्युनिस्ट पक्ष होणार शंभर वर्षाचा; काय बोलणार शी जिनपिंग

रम्सफेल्ड यांच्या परराष्ट्रमंत्री म्हणून दुसऱ्या कार्यकाळामध्ये 11 सप्टेंबर 2001 रोजी आत्मघातकी अपहरणकर्त्यांनी न्यूयॉर्कमधील वर्ल्डट्रेड सेंटरवर (World Trade Center) आणि पेटॅंगॉनवर (Patangon) हल्ला झाला होता. यामुळे लष्कराची पुरेशी तयारी नसतानाही देश युध्दामध्ये ओढला गेला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com