चीनच्या अलिबाबा समुहाचे संस्थापक जॅक मा बेपत्ता ; चीनी सरकारशी झालेल्या संघर्षानंतर दिसलेच नाहीत

वृत्तसंस्था
सोमवार, 4 जानेवारी 2021

चिनी टेक अब्जाधीश आणि अलिबाबाचे संस्थापक जॅक मा हे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारशी झालेल्या संघर्षानंतर गेल्या दोन महिन्यांपासून लोकांसमोर न आल्याने ते बेपत्ता झाल्याची भिती वर्तवली जात आहे.

पेइचिंग : चिनी टेक अब्जाधीश आणि अलिबाबाचे संस्थापक जॅक मा हे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारशी झालेल्या संघर्षानंतर गेल्या दोन महिन्यांपासून लोकांसमोर न आल्याने ते बेपत्ता झाल्याची भिती वर्तवली जात आहे.

बिझनेस जॅक मा टायकून त्याच्या स्वत:चा 'टॅलेंट शो' 'आफ्रिकास बिझिनेस हिरोज'च्या अंतिम भागामध्ये परिक्षक म्हणून हजेरी लावणार होते, परंतु अनाकलनीयपणे त्यासाठी ते उपस्थित राहू शकले नाहीत. म्हणून त्याची छायाचित्रे शोच्या वेबसाइटवरून काढूण्यात आल्याचे द टेलीग्राफ ने सांगितले.याला चीनचे हुकुमशाही सरकार जबाबदार असल्याच्या चर्चा आहेत. ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार, ख्रिसमसच्या आधी त्याच्या अलिबाबा ग्रुप च्या चौकशीसाठी मा यांना चीनमध्येच राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. बीजिंगने मा यांची आर्थिक तंत्रज्ञान कंपनी असलेल्या अँट ग्रुपला त्यांची उलाढाल कमी करण्याचे आदेश देण्यात आले होते. 

जॅक मा चीनच्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे आणि अलीकडील काही काळातील यूएन आणि जागतिक दैनंदिन कार्यासाठी त्यांनी केलेल्या कार्यामुळे चीनच्या जागतिक प्रतिमेला चांगला आधार मिळाला आहे.

 

 

संबंधित बातम्या