धक्कादायक! अमेरिकेत गोळीबाराच्या घटनेत 4 भारतीयांचा मृत्यू; कुटुंबीय संतप्त

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 17 एप्रिल 2021

अमेरिकेत अशाच एका गोळीबाराच्या घटनेत 4 भारतीय वंशाच्या जणांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे.

गेल्या काही दिवसांपासून गोळीबाराच्या अमेरिकेत वाढत जाताना दिसत आहेत. मात्र आता अमेरिकेत अशाच एका गोळीबाराच्या घटनेत 4 भारतीय वंशाच्या जणांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. दरम्यान या घटनेनंतर मृतांच्या कुटुंबियांकडून संताप व्यक्त केला जात असल्याचे समजते आहे. 

अमेरिकेत नेहमीच होत असणाऱ्या गोळीबाराच्या घटनांमध्ये अनेक निष्पापांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशाच एका घटनेत आता भारतीय वंशाच्या शीख समुदायाच्या 4 लोकांचा मृत्यू झाल्याचे झाल्याची घटना घडली आहे. अमेरिकेच्या इंडियनापोलीस येथील फेडएक्स कंपनीच्या परिसरात झालेल्या गोळीबाराच्या या घटनेत भारतीय वंशाच्या ४ जणांसह एकूण 8 जणांचा मुर्त्यू झाल्याचे समजते आहे. मृतांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये 66 वर्षीय अमरजितकौर जोहल, 64 वर्षीय जसविंदर कौर, 48 वर्षीय अमरजित सेखो आणि 68 वर्षीय जसविंदर सिंग यांचा समावेश असल्याचे समजते आहे. या घटनेनंतर या परिसरात राहणाऱ्या मृतांच्या नातेवाईकांच्या मनात मोठी भीती निर्माण झाली आहे. (4 Indians killed in US shooting Family angry)

शांघायमधील शिपयार्डमध्ये बनतेय चीनचे सर्वाधिक अत्याधुनिक विमानवाहू जहाज; पहा...

 या घटनेत मृत्यू पावलेल्या अमरजित जोहल यांच्या नातेवाईकांकडून या घटनेबद्दल शोक व्यक्त केला जातो आहे. या घटनेनंतर जोहल यांची नात कोमल चौहान यांनी 'या घटनेत आपल्या आजीला गमावल्याचे सांगताना अत्यंत दुःख होत असून, आमच्या समुदायावर इथे खूप अन्याय होत असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना देखील या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी देखील या घटनेवर प्रतिक्रिया दिली असल्याचे समजते आहे. "हे काय घडते आहे, या घटना थांबल्या पाहिजे असे म्हणत त्यानी ही घटना देशासाठी शरमेची बाब असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. 

दरम्यान, घटना घडलेल्या या कंपनीमध्ये 160 पेक्षा जास्त कामगार असून त्यामध्ये अनेक जण शीख समुदायाचे आहेत. गोळीबाराच्या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाल्यांनतर या सर्वांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, इथे आम्हाला असुरक्षित वाटत असल्याचे त्यांच्याकडून स्थानिक माध्यमांना सांगितले जाते आहे.

 

संबंधित बातम्या