तालिबानचा पाकिस्तानला धे धक्का! टीटीपीच्या चकमकीत चार सैनिक ठार

पाकिस्तान (Pakistan) आणि तालिबान (Taliban) यांच्यात झालेल्या गोळीबारात चार पाकिस्तानी सैनिक मारले गेले असल्याची पुष्टी पाकिस्तानी लष्कराने शुक्रवारी केली आहे.
तालिबानचा पाकिस्तानला धे धक्का! टीटीपीच्या चकमकीत चार सैनिक ठार


Taliban

Dainik Gomantak 

अफगाणिस्तानमध्ये तालिबानची राजवट पुन्हा नव्याने स्थापन करण्यामध्ये पाकिस्तान आणि चीनने मदत केली असल्याचा आरोप आंतरराष्ट्रीय स्तरावरुन सातत्याने करण्यात येतो. मात्र आता पाकिस्तानी रेजंर्स आणि तालिबान एकमेकांसोमर ठाकले आहेत. दोघांमधील अंतर्गत कलहात अफगाण जनता भरडली जात आहे. याच पाश्वभूमीवर पाकिस्तान (Pakistan) आणि तालिबान (Taliban) यांच्यात झालेल्या गोळीबारात चार पाकिस्तानी सैनिक मारले गेले असल्याची पुष्टी पाकिस्तानी लष्कराने शुक्रवारी केली आहे.

पाकिस्तानी लष्कराने म्हटले की, सुरक्षा दलांनी अफगाणिस्तानजवळील (Afghanistan) तालिबानच्या स्थळावर छापे टाकले आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला युद्धविराम संपल्यानंतर सशस्त्र गट आणि पाकिस्तान सुरक्षा दलांमधील हा सर्वात प्राणघातक संघर्ष आहे. उत्तर वझिरीस्तानमधील मीर अली शहरात दहशतवाद्यांनी हा हल्ला केला.

<div class="paragraphs"><p><br>Taliban</p></div>
तालिबानचा अफगाणिस्तान हत्यारांच्या ब्लॅक मार्केटवर अखेर पडदा

दरम्यान, पाकिस्तानी लष्कराने आपल्या निवेदनात म्हटले की, पहिला हल्ला वायव्येकडील टँक जिल्ह्यात करण्यात आला. यामध्ये दोन सशस्त्र सैनिक मारले गेले. दुसरा हल्ला उत्तर वझिरीस्तान जिल्ह्यात झाला, ज्यामध्ये चार सैनिकांना मारण्यापूर्वी एका सैनिकाला ताब्यात घेण्यात आले. उत्तर वझिरीस्तानमधील मीर अली शहरात सुरक्षा दलांनी संशयास्पद ठिकाणी छापे टाकले. लष्कराने पुढे सांगितले की, एका 'दहशतवाद्याला' शस्त्रास्त्रांसह पकडण्यात आले आहे. विशेष म्हणजे, युद्धबंदीच्या घोषणेपासून, पाकिस्तान सरकारने टीटीपी दहशतवाद्यांना शस्त्रे ठेवण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला होता.

तहरीक-ए-तालिबानने छाप्याला पुष्टी दिली

तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) ला 'पाकिस्तानी तालिबानी' म्हणूनही ओळखले जाते. ही पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना आहे, ज्याची मुळं अफगाण तालिबानशी संबंधित आहेत. टीटीपीने पुष्टी केली आहे की, पाकिस्तानी लष्कराने आमच्या एका ठिकाणावर छापा टाकला होता. हे ठिकाण अफगाणिस्तानातून कार्यरत असलेल्या टीटीपीसारख्या गटांचा फार पूर्वीपासून गड आहे.

पेशावरमधील शाळेवर झालेल्या हल्ल्यात 150 मुलांचा मृत्यू झाला होता

विशेष म्हणजे TTP ची स्थापना 2007 मध्ये झाली होती. 2014 मध्ये पेशावरमधील शाळेवर झालेल्या हल्ल्यासाठी ही संघटना कुप्रसिद्ध आहे, ज्यात 150 मुले मारली गेली होती. त्या बदल्यात, पाकिस्तानने टीटीपीचा बिमोड करण्यासाठी ठोस पावले उचलली होती. त्यानंतर या संघटनेने अफगाणिस्तानात आश्रय घेतला होता. तालिबानने काबूलवर कब्जा केल्यानंतर टीटीपी पुन्हा एकदा डोके वर काढत आहे, ज्याला रोखण्याचा पाकिस्तान प्रयत्न करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com