'कोरोनाचा धोका टळलेला नाही; चौथी लाट येणार?

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 13 फेब्रुवारी 2021

कोरोनाच्या चौथ्या लाटेचा इशारा इराणचे पंतप्रधान हसन रुहानी यांनी दिला.

कोरोना महामारीमधून जग अजूनही सावरेलेले नसताना कोरोनाच्या चौथ्या लाटेचा  इशारा इराणचे पंतप्रधान हसन रुहानी यांनी दिला आहे. या महामारीमुळे जगातील सर्वाधिक होरपळलेल्या मध्य पूर्वेतील देशात कोरोना पीडितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.''खजुस्तानच्य़ा दक्षिण- पश्चिम प्रांतातील काही शहरं कोरोनाच्या हाय रिस्क झोनमध्ये आली आहेत. याचाच अर्थ कोरोनाच्या नव्या चौथ्या लाटेची सुरुवात झाली आहे. आपण सगळ्यांनी मिळून हे सगंळ थांबवायला हवं. ही आपल्या सर्वांसाठी मोठी चेतावणी असणार आहे. असं मत रुहानी यांनी यावेळी मांडले आहे.'' इकॉनामिक टाईम्सने या संदर्भात वृत्त दिले. डिसेंबरच्या महिन्यात इराणने दिलेल्या सरकारी आकडेवारीनुसार 7 हजार पेक्षा कमी दैनंदिन रुग्णांची नोंद झाली होती. मात्र फेब्रुवारीच्य़ा सुरुवातीपासूनच कोरोना पिडितांच्या संख्येत वाढ होत आहे.

किम जोंग-उन च्या डोक्यात चाललंय तरी काय? उत्तर कोरिया अण्वस्त्रांना बनवतंय अजून...

यापूर्वी ब्रिटनमध्ये कोरोनाचा नव्या स्ट्रेनचा प्रसार मोठ्याप्रमाणात वाढला होता. जगभरात आत्तापर्यंत कोरोनामुळे तब्बल साडे तेवीस लाखांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनसोबत ब्राझीलमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंटचा प्रसार झाला होता. भारतामधील केरळ राज्य़ातही नव्या कोरोनाचा प्रसार वाढत आहे. भारतात लसीकरणाला सुरुवात झाली असतानाही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. जगभरात आत्तापर्यंत कोरोनामुळे तब्बल साडे तेवीस लाखांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनसोबत ब्राझीलमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंटचा प्रसार झाला होता. 

संबंधित बातम्या