France : संतप्त नागरिकानं चक्क राष्ट्राध्यक्षांच्याच कानशिलात लगावली!
macron.jpg

France : संतप्त नागरिकानं चक्क राष्ट्राध्यक्षांच्याच कानशिलात लगावली!

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष (President France) इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांनी मंगळवारी फ्रान्सच्या उत्तर-पश्चिम भागाच्या दौऱ्यावर होते. दरम्यान एक धक्कादायक घटना घडली. एका व्यक्तिने थेट राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या कानशिलामध्ये लगावली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर (Social media) प्रचंड व्हायरल होत आहे. लोकांकडून मॅक्रॉन शुभेच्छा स्वीकारत होते. दरम्यान त्यांनी एका व्यक्तिबरोबर हस्तांदोलन करत असताना त्यांच्यावर त्याने हात उगारला. त्यामुळे आजूबाजूला एकच हल्लकल्लोळ उडाला. (France Angry citizens hit the President in the ear)

राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांना लगावण्यात आलेली चापट जोरदार होती की, ते काही पावले मागे सरकले. लगेच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी (security personnel) रेलिंगजवळ येईन हल्लेखोराला पकडले. गेले काही दिवस मॅक्रॉन फ्रान्सच्या देशव्यापी दौऱ्यातील दुसऱ्या टप्प्यात व्यस्त आहेत. स्थानिक वृत्ताने दिलेल्या माहितीनुसार, चापट मारल्यानंतर रेलिंगजवळ उभे असलेले लोक जोरदार ओरडले. तात्काळ सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दोन व्यक्तींना अटक केली.  फ्रेंच पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पोलिस (Police) या दोघांची कसून चौकशी करत आहेत. तसेच हल्ल्यामागील कारणाचा देखील शोध घेण्यात येत आहे. 

दरम्यान, दुपारी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यावर झालेला हल्ला हा सुरक्षेतील मोठी चूक असल्याचे मानले जात आहे. हा हल्ला होण्यापूर्वी  राष्ट्राध्यक्ष एका हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना भेटून आले होते. त्याचवेळी त्यांना भेटायला हताश झालेल्या जमावाबरोबर हस्तांदोलन करण्यासाठी तेथे गेले असता मॅक्रॉन यांच्यावर हा हल्ला झाला. 

पुढच्या वर्षी पार पडणाऱ्या अध्यक्षीय निवडणूकीची तयारी मॅक्रॉन करत आहेत. निवडणूकीच्या सर्वेक्षणामध्ये दक्षिणपंथी नेते मरीन ले पेन (Marine Le Pen) मॅक्रॉन यांना पराभूत करतील असं दिसत आहे. त्यामुले येत्या दोन महिन्यात मॅक्रॉनने बऱ्याच भागात प्रवास करण्याची योजनाही आखली आहे. लोकांना थेट भेटण्याचा आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न मॅक्रॉन करत आहेत. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com