France Lockdown: फ्रान्समध्ये 4 आठवड्यांसाठी लॉकडाउन जाहीर

France Lockdown: फ्रान्समध्ये 4 आठवड्यांसाठी लॉकडाउन जाहीर
France Lockdown French President Emmanuel Macron has announced a 4 week lockdown in country

पॅरीस: फ्रान्समध्ये पुन्हा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी कोरोनाचा धोका लक्षात घेता देशभरात 4 आठवड्यांसाठी लॉकडाउन जाहीर केले आहे. कोरोना व्हायरसचा पुन्हा फ्रांन्समध्ये उद्रेक दिसू लागला आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी कोरोनाचा धोका लक्षात घेता देशभरात 4 आठवड्यांसाठी लॉकडाउन जाहीर केला आहे. बुधवारी, देशव्यापी लॉकडाऊनचे आदेश देताना अध्यक्ष मॅक्रॉन यांनी शाळा कमीत कमी तीन आठवड्यांसाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.

अत्यावश्यक वस्तूंची दुकाने खुली 

फ्रान्समध्ये कोरोना विषाणूची तिसरी लाट सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत अध्यक्ष मॅक्रॉन म्हणाले की, "आम्ही आता ठोस पावले उचलली नाहीत तर कोरोनावरील आपला ताबा सुटेल." फ्रान्समध्ये देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान केवळ आवश्यक वस्तूंची दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. ऑफिसमध्ये जाण्याऐवजी लोक वर्क फ्रॉम होम करतील. आणि या दरम्यान 10 किमीच्या पुढे जाण्यास मनाई असणार आहे.

कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे

"लॉकडाऊन दरम्यान कोरोना लसीकरणाचे काम वेगाने केले जाईल आणि उन्हाळ्याच्या अखेरीस सरकार 18 वर्षांवरील सर्व लोकांना कोरोना लस लागू करेल. आम्ही हे निर्णय लांबणीवर लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पण आता हे निर्णय काटेकोरपणे घेण्याची वेळ आली आहे," असे अध्यक्ष मॅक्रॉन म्हणाले.

फ्रान्समध्ये आतापर्यंत कोरोनाची 46 लाखांहून अधिक प्रकरणे पुढे आली आहेत. फ्रान्समध्ये कोरोना संसर्गाची एकूण पॉझीटिव्ह रूग्णांची  संख्या 46 लाखां पार गेली आहे तर कोरोनाच्या साथीमुळे आतापर्यंत 95,502 लोकांचा मृत्यू झाला आहे. अलिकडच्या काळात, ब्रिटनच्या नवीन प्रकारातील कोरोना विषाणूमुळे संसर्ग होण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. डब्ल्यूएचओच्या मते, ३१ मार्च रोजी एकाच दिवसात  २९५७५ लाकोना संसर्ग झाल्याची नोंद झाली आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com