फुमिओ किशिदा बनले जपानचे नवे पंतप्रधान

फुमिओ किशिदा (Fumio Kishida) यांच्यावर राष्ट्रीय निवडणुकीच्या आधी, कोरोना महामारी आणि सुरक्षेच्या आव्हानांना त्वरित सामोरे जाण्याचे आव्हान असणार आहे.
फुमिओ किशिदा बनले जपानचे नवे पंतप्रधान
Japan Prime Minister Fumio KishidaDainik Gomantak

जपानच्या (Japan) संसदेने सोमवारी माजी परराष्ट्र मंत्री फुमियो किशिदा (Fumio Kishida) यांची देशाचे नवे पंतप्रधान (Japan Prime Minister) म्हणून निवड केली आहे. फुमिओ किशिदा यांच्यावर राष्ट्रीय निवडणुकीच्या आधी, कोरोना महामारी आणि सुरक्षेच्या आव्हानांना त्वरित सामोरे जाण्याचे आव्हान असणार आहे. योशिहिदे सुगा (Yoshihide Suga) यांची जागा किशिदा घेणार आहेत. सुगा आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने एक दिवसच आधीच राजीनामा दिला आहे. किशिदा आणि त्यांचे मंत्रिमंडळ आज शपथ ग्रहण करतील.

जपानमध्ये कोरोना काळात ज्या पध्दतीने सुगा प्रशासनाने हाताळणी केली तसेच संसर्ग वाढत असतानाही ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करण्यावर अडीग राहिल्यामुळे पंतप्रधान सुगा यांना एका वर्षानंतर पदावर असताना राजीनामा देण्याची वेळ आली. जपानच्या माजी परराष्ट्र मंत्री किशिदा यांनी गेल्या आठवड्यात सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे (Liberal Democratic Party) नेते म्हणून निवडणूक जिंकली.

Japan Prime Minister Fumio Kishida
ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरु करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची न्यायालयात धाव

किशिदा यांनी लोकप्रिय मंत्री तारो कोनो (Taro Kono) यांचा पराभव केला. त्यांनी पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत सना ताकाची आणि सेको नोडा (Seko Noda) या दोन महिला उमेदवारांचा पराभव केला. त्यांच्या विजयावरुन असे दिसून आले की, किशिदा यांना त्यांच्या पक्षातील दिग्गजांचा पाठिंबा असल्याचे दिसून आले आहे. कोनो या मुक्त विचारसरणीचा अंगीकार करणाऱ्या व्यक्ती आहेत. तर किशिदा हे शांत उदारमतवादी म्हणून ओळखले जातात, परंतु पक्षातील प्रभावशाली पुराणमतवाद्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांनी आक्रमक नेत्याची प्रतिमा निर्माण केली.

Japan Prime Minister Fumio Kishida
चीनची तैवानमध्ये सर्वात मोठी घुसखोरी; 38 लढाऊ विमाने संरक्षण क्षेत्रात उतरली

जपानी प्रसारमाध्यमांनी सुगा यांच्या 20 सदस्यीय मंत्रिमंडळातील दोन सदस्यांना वगळता नवीन नेत्यांना जबाबदारी सोपवली जाईल असे म्हटले आहे. ज्या नेत्यांनी पक्षाच्या निवडणुकीत किशिदा यांना पाठिंबा दिला होता त्यांच्याकडे बहुतेक महत्त्वाची पदे सोपवली जातील असही सांगण्यात येत आहे. मंत्रिमंडळात फक्त तीन महिला नेत्यांचा समावेश असेल असही सूचित करण्यात आले आहे.

जपानच्या कूटनीति आणि सुरक्षा धोरणांची सुनिश्चितता करुन परराष्ट्र मंत्री तोशिमीत्सु मोटेगी आणि संरक्षण मंत्री नोबूओ किशी यांना मंत्रिमंडळात कायम ठेवले जाईल. तसेच या भागातील चीनच्या वाढत्या हालचाली आणि तणाव लक्षात घेता जपानला अमेरिकेबरोबर द्विपक्षीय सुरक्षा करारावर पुन्हा एकदा नव्याने काम करायचे आहे. किशिदा जपानची राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक आयाम लक्षात घेता एक नवे कॅबिनेट पद तयार करतील आणि त्याची जबाबदारी 46 वर्षीय तकायुकी कोबायाशी यांच्याकडे सोपवतील असही सांगण्यात येत आहे.

Japan Prime Minister Fumio Kishida
ड्रॅगन गरीब देशांच्या ऐक्य आणि अखंडतेला धोका पोहोचवतोय: रिपोर्ट

किशिदा जपान आणि अमेरिका यांच्यातील सहकार्य पुन्हा एकदा नव्याने वाढवतील. त्याचबरोबर आशिया आणि युरोपमधील इतर समविचारी देशांशी मैत्रीपूर्ण संबंधांचे समर्थनही करतील असेही तज्ञांकडून सांगण्यात येत आहे. ज्याचा उद्देश चीन आणि उत्तर कोरियाचा सामना करण्याच्या हेतूंपैकी एक आहे. नोव्हेंबरच्या मध्यावर होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी किशिदा आपले धोरणात्मक भाषण या आठवड्याच्या शेवटी देतील अशी शक्यताही वर्तवली जात आहे.

दरम्यान, नव्या नेत्यावर पक्षाची प्रतिमा सुधारण्याचा दबाव असणार आहे. सुगा यांनी कोरोना महामारीच्या काळात ज्या पध्दतीने हाताळणी केली त्यामुळे त्यांना टीकेचा सामना करावा लागला होता. त्याचबरोबर टोकियोमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्याच्या हट्टामुळे त्यांना सार्वजनिक टीकेचा सामनाही करावा लागला आहे. कंझर्व्हेटिव्ह लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीला (एलडीपी) येत्या दोन महिन्यांत निवडणुकांपूर्वी त्वरीत जनतेचा पाठिंबा मिळवणे आवश्यक आहे.

Related Stories

No stories found.