कोरोना संकटात झोपडपट्टीवासीयांचीही स्वप्नं होणार साकार

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

जवळपास 4.5 कोटी ब्राझीलच्या लोकांकडे बँक अकाऊंट नाही असे 2019 च्या एका रिपोर्टनुसार सांगण्यात आले आहे. म्हणून आता G10 बँकेने ही कमतरता भरुन काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

ब्राझीलीया: कोरोनाव्हायरस हा साथीचा रोग सर्व देशभर आणि जगभर पसरलेला आहे. शासनापासून ते प्रशासनापर्यंत सगळ्यांचीच परिस्थिती ढासळली आहे. प्रत्येकालाच या काळात आर्थिक परिस्थितीला सामोरे जाव लागल आहे. सामान्यापासून ते आमासामान्य उद्योगधंद्यांवर परिणाम झालेला आपल्याला दिसला. आता कुठे काही प्रमाणात परिस्थितीत सुधारणा होत आहे. तरी अनेक देशात ही परिस्थीती अजूनही कायम आहे. कोरोना महामारीचा परिणाम झालेल्या देशांपैकीच एक असलेला देश म्हणजे ब्राझील. कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका ब्राझीलच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना बसला आहे.   याच कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी तेथिल लोकांनी देशातील 10 सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यांमध्ये आता या कोरोनाला लढा देण्याची एक योजना आखली आहे. 10 झोपडपट्यांनी मिळून स्वत:ची एक बॅक काढण्याचा निर्णय घेतला आहे.

पारंपारिक बँकिंग व्यवस्थेतून वगळलेल्या झोपडपट्टीत राहणाऱ्यांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागला. अशा परिस्थितीत कोरोना संकटाशी दोन हात करण्याचा निर्णय ब्राझीलच्या लोकांनी घेतला आहे.  G10 बँक लवकरच सुरु होणार आहे आणि या बॅक द्वारे अडचणीत असणाऱ्या छोट्या उद्योगांना कर्ज पुरवले जाणार आहे. तसेच पारंपरिक बँक सुविधेपासून वंचित राहिलेल्या झोपडपट्टी रहिवाशांना डेबिट कार्डची सेवा दिली जाणार आहे. अमेरिकेनंतर जगभरात साथीच्या रोगाने जगात दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या ब्राझीलमध्ये 225,000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमधील दारिद्र्याचे पोस्टकार्ड असलेल्या फावेल्समध्ये हा त्रास विनाशकारी झाला आहे.

कोविड 19 मधील आरोग्याच्या दृष्टीने गरीबांना फक्त त्रास सहन करावा लागला नाही तर त्यांना आर्थिक परिणामाला देखील पुढे जाव लागल आहे.
झोपडपट्टीत राहणारे लोक अनौपचारिक क्षेत्रात काम करत असतात. मुलांची देखभाल आणि घरकाम यासारख्या नोकर्‍या कोरोना कळात गेल्या. तेव्हा घरात राहणाऱ्या लोकांचा पोटमारा होवू लागला. कोरोना काळात उत्पनाचे सर्वच क्षेत्र बंद पडले. आणि बेरोजगारीचा दर 14.6 टक्क्यांवर गेला.
कोरोना काळातील आपात्कालीन परिस्थितीसाठी ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोलसोनारो यांनी गरीबांना दर महिन्याला 110 डॉलर देण्याची घोषणा केली होती, काही काळातच या रकमेत घट करण्यात आली. आणि अखेर  2020 च्या शेवटी ही योजना ब्राझील सरकारकडून बंद करण्यात आली. अशा परिस्थीतीत ब्राझीलमधील गरीब लोकांना रोजचे जेवण मिळणेही कठीण झाले होते. अशा लोकांसाठी बँक किंवा डेबिट कार्ड हा पर्याय कधीच नव्हता. कोणतीही बँक नेहमीप्रमाणे या लोकांना कर्ज द्यायाला तयार नव्हती. 

जवळपास 4.5 कोटी ब्राझीलच्या लोकांकडे बँक अकाऊंट नाही असे 2019 च्या एका रिपोर्टनुसार सांगण्यात आले आहे. म्हणून आता G10 बँकेने ही कमतरता भरुन काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. G10 बँकेमध्ये आपले खाते काढणारे ग्राहक ब्राझीलच्या झोपडपट्टीमधले रहिवाशी असणार आहेत. ही बँक या लोकांना कमी व्याजाचे कर्ज देणार आहे. त्यासोबतच त्यांना डेबिट कार्डची सुविधा सुद्धा उपलब्ध करुन देणार आहे. ब्राझीलच्या अज्ञात लोकांनी G10बँकेमध्ये गुंतवणूक केली आहे. ही G10 बँक ब्राझीलच्या  झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना पुन्हा जगण्याची उम्मीद देणार अशी आशा आहे. 

गोव्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संबंधित बातम्या