Gambia’s VP Badara Joof: गॅम्बियाचे उपराष्ट्रपती बदारा अलियु जूफ यांचे भारतात निधन

65 वर्षीय जूफ यांची 2022 मध्ये पश्चिम आफ्रिकन देशाचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
Gambia’s VP Badara Joof
Gambia’s VP Badara JoofDainik Gomantak

गॅम्बियाचे उपराष्ट्रपती बादरा अलियु जूफ यांचे भारतात निधन झाले आहे. आजारपणामुळे त्यांचे निधन झाले असल्याची माहिती गॅम्बियाचे अध्यक्ष अदामा बॅरो यांनी बुधवारी ही माहिती दिली.

65 वर्षीय जूफ यांची 2022 मध्ये पश्चिम आफ्रिकन देशाचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी यापूर्वी 2017 ते 2022 पर्यंत शिक्षण मंत्री म्हणून काम केले होते.

(Gambian vice president dies after ‘short illness’ in India)

Gambia’s VP Badara Joof
Baharain-Goa Flight: 'या' दिवशीपासून सुरू होणार बहारीन-दाबोळी विमानसेवा...

"गॅम्बियाचे उपराष्ट्रपती बादरा अलियु जूफ यांचे भारतात निधन झाले आहे. आजारपणामुळे भारतात त्यांचे निधन झाले." अशी माहिती गॅम्बियाचे अध्यक्ष अदामा बॅरो यांनी ट्विटरवर दिली आहे.

Gambia’s VP Badara Joof
Watch Video: '...तर संपूर्ण मीडिया हाऊस बंद करेन', तालिबान नेत्याचा व्हिडीओ व्हायरल!

2016 च्या निवडणुकीत बॅरो यांनी बलाढ्य याह्या जम्मेह विरुद्धचा ऐतिहासिक विजय मिळवला होता. बॅरो यांच्या नेतृत्वाखाली जूफ दुसऱ्यांदा उपराष्ट्रपती म्हणून काम करत होते. तर, चारवेळा त्यांनी उपराष्ट्रपतीपद भूषविले आहे.

दिवंगत उपराष्ट्रपती यांनी पूर्वी गॅम्बियन नागरी सेवेत आणि नंतर जागतिक बँकेत पश्चिम आणि मध्य आफ्रिकेसाठी शिक्षण विशेषज्ञ म्हणून काम केले होते, उच्च शिक्षण, संशोधन, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री म्हणून देखील त्यांनी काम केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com