Ganesh Chaturthi 2022: गणपतीची मुद्रा असलेली सोन्याची बिस्किटं ब्रिटनमध्ये तयार

Ganesh Festival 2022: गणेश चतुर्थीच्या आधी, रॉयल मिंटने गणपतीचा फोटो असलेले गोल्ड बुलियन बार जारी केला आहे जो ऑनलाइन विकला जाईल.
Gold Bullion Bar| Ganesh Chaturthi
Gold Bullion Bar| Ganesh Chaturthi Twitter

देशात गणेश चतुर्थीचा उत्सव जल्लोषात साजरा केला जातो. लोक बाप्पाला आपल्या घरी आणतात. अनेक लोक या दिवशी खरेदी करायला महत्व देतात. यामुळे सोन्याचे भाव खाली आले असताना, गणपतीचा (Ganpati) फोटो असलेले गोल्ड बुलियन बार खरेदी करण्याची संधी आहे. ब्रिटनची नाणे बनवणारी सरकारी संस्था रॉयल मिंटने गणेश चतुर्थीच्या आधी गणपतीचा फोटो असलेले गोल्ड बुलियन बार (Gold Bullion Bar) जारी केले आहेत.

* विघ्नहर्ताचे चित्र असलेली
सोन्याची बिस्किटे या आठवड्यापासून 20 ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्किटे ऑनलाइन (Online) विकली जाणार असल्याचे समजते. गणपतीचा फोटो असलेल्या सोन्याच्या बिस्किटाची किंमत सुमारे £1,110.80 म्हणजेच सुमारे एक लाख रुपये आहे. हे सोनेरी बिस्किट इमा नोबेल नावाच्या डिझायनरने डिझाइन केले आहे. ट्विटरवर (Twitter) माहिती देताना रॉयल मिंटने (Royal Mint) लिहिले की, "या वर्षी पहिल्यांदाच 'शुभंकर' भगवान गणेश 20 ग्रॅम सोन्याच्या बिस्किटांवर विराजमान होणार आहेत.

Gold Bullion Bar| Ganesh Chaturthi
China Taiwan Conflict: चिनी तणावादरम्यान तैवानच्या संरक्षण मंत्रालयाची वेबसाइट हॅक

गणेश चतुर्थीला सोन्याची बिस्किटे खरेदी करा
31 ऑगस्ट रोजी देशभरात गणेश चतुर्थीचा (Ganesh Chaturthi) सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे. त्यामुळे ब्रिटनच्या (Britain) रॉयल मिंटने तुमच्यासाठी गणपतीच्या चित्रासह गोल्ड बुलियन बार खरेदी करण्याची संधी आणली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com