Gas cylinder Blast in Russia: गॅस सिलिंडरच्या स्फोटात रशियातील अपार्टमेंट कोसळली

अपार्टमेंटचा भाग कोसळल्याने चार मुलांसह नऊ जण ठार, तर एक बेपत्ता
Gas Cylinder Blast
Gas Cylinder BlastDainik Gomantak

(Gas cylinder Blast) रशियाच्या सखालिन बेटावर पाच मजली इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. 20 लिटरच्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने सदर इमारतीचा भाग कोसळल्याची तपास समितीने माहिती दिलीय. या घटनेत कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबून चार मुलांसह नऊ जणांचा मृत्यू झालाय. त्याचबरोबर एक व्यक्ती अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती राज्यपालांनी दिलीय.

Gas Cylinder Blast
Plane-Truck Crash Viral Video: रनवेवर ट्रकला विमानाची भीषण धडक; पाहा पेरूतील थराराचा व्हिडिओ

मॉस्कोच्या वेळेनुसार पहाटे 5:30 वाजता तेथील एका अपार्टमेंटमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर टिमोव्स्काया शहरातील पाच मजली इमारतीचा काही भाग कोसळल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेनंतर बचावपथक घटनास्थळी दाखल झालं असून ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या व्यक्तींचा शोध सुरु आहे. या शोध कार्यादरम्यान इमारतीत राहणाऱ्या ३३ लोकांपैकी काहींचा शोध लागत नसल्याचे बचावपथकाचे म्हणणे आहे. .

Gas Cylinder Blast
FIFA World Cup 2022: युद्ध रशिया-युक्रेनचे; ताप पोलंडच्या फुटबॉल टीमला

टास या वृत्तसंस्थेने आपत्कालीन सेवांमधील एका स्रोताचा हवाला देत म्हटले आहे की, 20 लिटरच्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला, ज्यामुळे अपार्टमेंटचा काही भाग कोसळला. रशियाच्या तपास समिती या घटनेची अधिक माहिती घेत असून या घटनेमागच्या कारणांचा शोध घेऊन उलगडा करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com