‘हायाबुसा २’च्या अवकाशयानाने गोळा केले २ लाख २० हजार किलोमीटरवरील लघुग्रहांच्या मातीचे नमुने

PTI
सोमवार, 7 डिसेंबर 2020

जपानच्या ‘हायाबुसा-२’ या अवकाशयानाने सोडलेली कुपी नियोजनाप्रमाणे ऑस्ट्रेलियामधील वाळवंटात पडली आणि जपानच्या शोधपथकाने हेलिकॉप्टरद्वारे शोध घेऊन ती ताब्यातही घेतली आहे.

टोकियो : जपानच्या ‘हायाबुसा-२’ या अवकाशयानाने सोडलेली कुपी नियोजनाप्रमाणे ऑस्ट्रेलियामधील वाळवंटात पडली आणि जपानच्या शोधपथकाने हेलिकॉप्टरद्वारे शोध घेऊन ती ताब्यातही घेतली आहे. या कुपीमध्ये २ लाख २० हजार किलोमीटर अंतरावरील लघुग्रहावरील मातीचे गोळा केलेले नमुने आहेत.  

‘हायाबुसा’ यानाने शनिवारी कुपी पृथ्वीच्या दिशेने यशस्वीपणे सोडली होती. ती कुपी आज पृथ्वीपासून १२० किमी अंतरावर वातावरणात शिरताच हवेशी होत असलेल्या घर्षणामुळे आगीच्या गोळ्याप्रमाणे भासत होती. जमिनीपासून दहा किलोमीटर अंतरावर असताना कुपीतील उष्णतारोधी कवच बाजूला होऊन पॅराशूटच्या साह्याने ती अलगद वाळवंटात पडली. 

 

अधिक वाचा :

चंद्रावरील मातीचे नमुने ‘ऑर्बिटर’च्या ताब्यात

आता कारमध्येही रोखता योणार कोरोनाचा प्रसार

पॅरिसमध्ये सुरक्षा कायद्याविरुद्ध हजारो नागरिकांकडून अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याविरूद्ध निदर्शने 

संबंधित बातम्या